BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गोरक्षनाथ यात्रेत हजारो भाविकांची गर्दी | Thousands of devotees flock to Gorakshnath Yatra

शिराळा, १६ एप्रिल २०२३  :शिराळा येथील गोरक्षनाथ यात्रेसाठी सांगली,सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक दिंड्या जयजय राम कृष्ण हरीच्या गजरात  व  टाळ मृदुंगाच्या निनादात हजर झाल्या आहेत. महायोगी गोरक्षनाथ यात्रेला हजारो भाविकांच्या पहाटेपासूनच रांगा लागल्या होत्या. पहाटे तीन वाजता मठाधिपती पीर परासनाथ महाराज,आनंदनाथ महाराज,स्वप्नील निकम,संतोष हिरुगडे,प्रवीण शेटे   यांच्या हस्ते गोराक्षनाथांची पूजा करून अभिषेक  घालण्यात आला.

गोरक्षनाथ यात्रेत हजारो भाविकांची गर्दी  | Thousands of devotees flock to Gorakshnath Yatra

     शिराळा येथील गोरक्षनाथ यात्रा ७  दिवस भरते. या ठिकाणाला प्रती पंढरपूर म्हणून ओळखले जाते. पहाटे पासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची गोरक्षनाथांच्या दर्शनासाठी रांग  होती.मंदीर प्रशासनाने येणाऱ्या सर्व भाविकांना उपवासाच्या फराळाची सोय केली होती. शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी यात्रेमध्ये कोणत्या ही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये याची दक्षता घेऊन पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात केला आहे. मठाधिठपती पारसनाथजी महाराज, आनंदनाथजी महाराज यांच्या सह तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील, स्वप्नील निकम, संतोष हिरुगडे हे यात्रेसाठी अविरत कार्यरत आहेत.  यात्रा मार्गावर  कै. बाबा नाईक प्रतिष्ठापनच्यावतीने वसंत पाणपोईची सोय करण्यात आली आहे.शिराळा नगरपंचायतचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी वारकऱ्यासाठी  एक टन शाबु  खिचड़ी वाटप केली. खासदार संजय पाटील व आमदार विनय कोरे यांनी गोरक्षनाथ मंदिर परिसरात विद्युत रोषणाई साठी १२ विद्युत पोलची सोय केली आहे.

गोरक्षनाथ यात्रेत हजारो भाविकांची गर्दी  | Thousands of devotees flock to Gorakshnath Yatra

 मुख्याधिकारी योगेश पाटील व खासदार संजय पाटील पाण्यासाठी कुपनलिकेची सोय केली आहे. आमदार विनय कोरे यांनी भाविकांच्यासाठी थंड पाण्याच्या टँकरची सोय केली आहे. यात्रा कालावधीत सरकारी कर्मचारी व साधू संत यांच्या जेवणाची  सोय  खासदार संजय पाटील व  वारणा बँकेचे अध्यक्ष  विश्वेश कोरे यांनी केली आहे. आठ दिवस लागणाऱ्या पाच हजार पाणी बाटलीची व्यवस्था  स्वप्निल निकम व  संतोष हिरुगडे यांनी केली आहे.दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आनंदी पार्क प्लॉटिंग प्रोजेक्टच्या वतीने   विश्वास उर्फ बंडा   कदम यांनी  खिचडी वाटप केले.

मुख्यमंत्री योगी यांच्या शुभेच्छा 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व मध्यप्रदेशचे कृषी मंत्री कमल पटेल यांनी पारसनाथ महाराज यांना दूरध्वनीवरून यात्रेच्या शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

0 Comments