BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कडाडणारी हलगी, तुतारीचा निनादात सचिनचा वाढदिवस |,Sachin's birthday with a rousing halgi, a trumpet call

संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पहा 
 
कडाडणारी हलगी, तुतारीचा निनादात सचिनचा वाढदिवस |,Sachin's birthday with a rousing halgi, a trumpet call 

शिराळा, ता. २४ : कडाडणारी हलगी, तुतारीचा निनादात आणि जिकडं तिकडं  तेंडल्याची हवा ,पाच मे लक्षात ठेवा च्या जयघोषात  औंढी (ता,शिराळा) येथे भारतरत्न क्रिकेटपटू, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा पन्नासावा वाढदिवस  'तेंडल्या' चित्रपटाच्या टीमने एकत्रित मोठ्या  जल्लोषात साजरा केला. या जल्लोषी वातावरणाता  क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी यापुढे २४ एप्रिल हा जागतिक क्रिकेट दिन म्हणून मानला जाईल असा षटकार मारून  सचिनच्या सर्वांची चाहत्यांची मने जिंकली. 

कडाडणारी हलगी, तुतारीचा निनादात सचिनचा वाढदिवस |,Sachin's birthday with a rousing halgi, a trumpet call 

सचिन तेंडुलकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज औंढी गावात सणाचे वातावरण होते. प्रत्येक घराच्या समोर बॅटवर 'तेंडल्या'चे स्टिकर असणाऱ्या गुढ्या उभारून  सर्वत्र रांगोळी काढण्यात आली होती.  हनुमान मंदिरापासून प्रत्यक्ष मिरवणुकीला प्रारंभ झाला. पालखीत सचिन तेंडुलकर यांचा अर्धपुतळा होता. गावातील महिलांचे लेझीमपथक होते. हलगी आणि तुतारीच्या निनादात दिंडी सुरू झाली. डोक्यावर तुळस व सजवलेली बॅट घेऊन महिला अग्रभागी होत्या. रस्त्यावरून मिरवणुकीदरम्यान पालखीवर फुलांची उधळण करण्यात येत होती. जागोजागी महिला औक्षण करत होत्या. ग्रामपंचायत कार्यालयासमोरील जागेत पालखीचा समारोप झाला. याठिकाणी सचिन तेंडुलकर यांच्या मोठ्या कटआउटचे अनावरण करण्यात आले. तिरंगी रंगात रंगलेल्या चिमुकल्या शाळकरी पोरांनी जिकडं तिकडं  तेंडल्याची हवा ,पाच मे लक्षात ठेवा या तेंडल्या चा जयघोष करत परिसर दणाणून सोडला. जुन्या पद्धतीच्या चलचित्रफीतीच्या माध्यमातून यावेळी सचिन तेंडुलकरला तेंडल्या हा चित्रपट समर्पित करण्यात आला. ज्येष्ठ क्रिडा पत्रकार सुनंदन लेले यांनी आजच्या दिवसाचे महत्त्व सांगत यापुढे अधिकृत कुणी घोषणा करो अथवा न करो, आम्ही मात्र 'जागतिक क्रिकेट दिन' म्हणून आजचा दिवस घोषित करत असल्याचे त्यांनी  जाहीर केले. गावातील ग्रामस्थांमध्ये अपूर्व उत्साह संचारला होता. लहान मुलांपासून वृद्ध पुरुष महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

कडाडणारी हलगी, तुतारीचा निनादात सचिनचा वाढदिवस |,Sachin's birthday with a rousing halgi, a trumpet call 

उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, दिग्दर्शक सचिन जाधव, चैतन्य काळे, नचिकेत वाईकर, मुख्य कलाकार फिरोज शेख व अमन कांबळे, संजय कांबळे, राजू कांबळे, बाबासो पाटील, मोहन पाटील, भाऊसो पाटील, विजय पाटील, बाळकृष्ण पाटील, कृष्णा पाटील, विकास पाटील, प्रवीण जाधव, संतोष पाटील, बी. जी. पाटील, सरपंच चेतन पाटील, सुहास पाटील, कालीदास पाटील, सुनील पाटील, राजू देसाई, अधिक खोत आदी उपस्थित होते.

कडाडणारी हलगी, तुतारीचा निनादात सचिनचा वाढदिवस |,Sachin's birthday with a rousing halgi, a trumpet call 

 १५० बॅट असणाऱ्या गुढ्या 

औंढी येथे उभारण्यात आलेल्या १५० गुढ्या साठी  'तेंडल्या' चित्रपटाच्या टीमने गावागावातून १५० बॅट गोळा केल्या होत्या.त्यामुळे ह्या गुढ्या लक्षवेधी ठरल्या.

कडाडणारी हलगी, तुतारीचा निनादात सचिनचा वाढदिवस |,Sachin's birthday with a rousing halgi, a trumpet call 

 पूजन आणि १०० वडापाव  

सचिन च्या भव्य कटआउटचे अनावरण करुन त्याचे औक्षण करत  सचिनचे आवडते खाद्य वडापाव असल्याने याठिकाणी त्याने आतापर्यंत मारले शंभर शतकांची दखल घेत त्याच्यासाठी  शंभर वडापाव चा नैवेद्य दाखवण्यात आला. 

कडाडणारी हलगी, तुतारीचा निनादात सचिनचा वाढदिवस |,Sachin's birthday with a rousing halgi, a trumpet call 

बाल मनाचं प्रतिबिंब चित्रपटात 

माझे वडील  प्राथमिक शिक्षक म्हणून औंढी येथे होते. त्यामुळे ३ ते ७ वी पर्यंतचे माझे  बालपणऔंढीत गेले. त्यावेळी सचिन तेंडूलकर यांची क्रिकेटमध्ये मोठी क्रेज होती. त्यावेळी माझ्या बालमनात घर करून राहिलेल्या क्रिकेटच्या आठवणीतून या चित्रपटाची निर्मिती झाली.  याच गावातून  चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ केला.यशाच्या शिखरावर पोहचत असताना सिनेमातील अनेक घटना या गावात घडलेल्या असल्याने सचिन तेंडुलकरच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा करण्यासाठी या गावाची निवड केली. एकूणच 'तेंडल्या'च्या निर्मितीप्रक्रियेत या संपूर्ण गावाचे योगदान मोठे आहे.

 सचिन जाधव दिग्दर्शक .

कडाडणारी हलगी, तुतारीचा निनादात सचिनचा वाढदिवस |,Sachin's birthday with a rousing halgi, a trumpet call 

Post a Comment

0 Comments