BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

भाजपा सरकारच महिला सबलीकरण करू शकते-प्रदेश उपाध्यक्षा वर्षाताई भोसले| Only BJP government can empower women - state vice president Vrshatai Bhosle

 शिराळा,ता.१६: पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे नेतृत्व सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारे व सर्वसामावेशक आहे. त्यांनी  जगामध्ये भारत देशाला अग्रस्थानी नेले  असून भाजपा सरकारच महिला सबलीकरण करू शकते. महिलांसाठी नवनवीन योजना राबवण्याचे काम भाजपने केले आहे असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वर्षाताई भोसले यांनी केले. 

भाजपा सरकारच महिला सबलीकरण करू शकते-प्रदेश उपाध्यक्षा  वर्षाताई भोसले| Only BJP government can empower women - state vice president Vrshatai  Bhosle

      शिराळा येथे लकी मंगल कार्यालयात  सांगली जिल्हा महिला मोर्चा व शिराळा विधानसभा महिला मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भाजपा महिला बूथ सशक्तीकरण अभियान व महिला मेळावा कार्यक्रमात  बोलत होत्या. यावेळी निनाई शिक्षण संस्थेच्या सचिवा,यशस्वीनी फाउंडेशन मुंबईच्या संस्थापक रेणुकादेवी देशमुख अध्यक्षस्थानी होत्या.सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भाजपा सरकारच महिला सबलीकरण करू शकते-प्रदेश उपाध्यक्षा  वर्षाताई भोसले| Only BJP government can empower women - state vice president Vrshatai  Bhosle

स्वागत विद्याताई कुलकर्णी यांनी तर  प्रास्ताविक  उषाताई दशवंत यांनी केले.यावेळी भोसले म्हणाल्या, महिलांना ५०  टक्के आरक्षण,उज्वला गॅस योजना, मातृवंदना योजना,किसान सन्मान योजना, जन-धन योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना थेट मदत भाजप सरकारने केली आहे. महिलांनी राजकारणात अग्रेसर राहून बुथ पातळीवर काम करणे आवश्यक आहे. बुथ सक्षम झाल्यास त्याच्या माध्यमातून भाजप सरकारची असणारी कामे लोकांपर्यंत पोहोचू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना  उद्योग व्यवसायासाठी अनेक योजना राबवली आहेत. महिलांना एस.टी.मध्ये पन्नास टक्के सवलत देणारे हे एकमेव राज्य आहे. 

भाजपा सरकारच महिला सबलीकरण करू शकते-प्रदेश उपाध्यक्षा  वर्षाताई भोसले| Only BJP government can empower women - state vice president Vrshatai  Bhosle

    रेणुकादेवी देशमुख म्हणाल्या, शिवाजीराव देशमुख यांनी शिराळा वाळवा तालुक्यातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत.त्यांच्यामुळेच आज या तालुक्यांची प्रगती निश्चितपणे झाले आहे. डोंगरी परिषद या ठिकाणी घेऊन शिराळा तालुका हा डोंगरी तालुका म्हणून राज्यामध्ये  गणला गेला. याचे अनेक फायदे आज होत आहेत. महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आपली आर्थिक सक्षमता दाखवली पाहिजे. नवनवीन उद्योग व्यवसाय उभे करणे गरजेचे आहे. 

भाजपा सरकारच महिला सबलीकरण करू शकते-प्रदेश उपाध्यक्षा  वर्षाताई भोसले| Only BJP government can empower women - state vice president Vrshatai  Bhosle

   यावेळी  माजी सभापती शारदाताई पाटील, सांगली जिल्हा भाजपा उपाध्यक्ष विद्याताई पाटील, पंचायत समिती माजी सभापती शारदाताई घारगे,कोकरूड सरपंच अनिताताई देशमुख,सुरेखा देशमुख, कांचनताई देशमुख, सुरेखा जगताप,पुष्पा मिठारी  उपस्थित होत्या.आभार संगीता साळुंखे यांनी मानले.

भाजपा सरकारच महिला सबलीकरण करू शकते-प्रदेश उपाध्यक्षा  वर्षाताई भोसले| Only BJP government can empower women - state vice president Vrshatai  Bhosle

 भेटीला लवकरच येईन  

भारतीय जनता पार्टीच्या  महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ ह्या शिराळा येथे येणार होत्या. त्यामुळे महिलांच्याता मोठा उत्साह व कुतूहल निर्माण झाले होते.परंतु  त्या येवू शकल्या नसल्याने त्यांनी उपस्थित महिलांशी व्हिडीओ संवाद साधून मी लवकरच तुमच्या भेटीला येईल असे आश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments