मोटारसायकल वरून पडून एकाचा मृत्यू |One died after falling from a motorcycle
मोटारसायकल वरून पडून एकाचा मृत्यू |One died after falling from a motorcycle
शिराळा:शिवरवाडी (ता.शिराळा) येथे अमर हणमंत पाटील (वय ३३) रा. कराड यांचा मोटरसायकलवरुन रस्त्यावर पडलेल्याने मृत्यू झाला. सदर घटना शुक्रवार ता. २८ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
मोटारसायकल वरून पडून एकाचा मृत्यू |One died after falling from a motorcycle
याबाबत शिराळा पोलीस ठाण्यात डॉ. योगीता माने यांनी वर्दी दिली आहे. याबाबत शिराळा पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, अमर पाटील हे आपल्या मोटरसायकलवरुन शिवरवाडी हद्दीत रस्त्यावर पडलेल्याने डोक्याला मार लागून जखमी झाले . त्यास उपचारासाठी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारा पुर्वी मृत्यू झाला. त्यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
मोटारसायकल वरून पडून एकाचा मृत्यू |One died after falling from a motorcycle
0 Comments