BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पोहायला गेलेल्या मुलाचा मृत्यू |Death of a child who went swimming

पोहायला गेलेल्या मुलाचा मृत्यू |Death of a child who went swimming

पोहायला गेलेल्या मुलाचा मृत्यू |Death of a child who went swimming

पोहायला गेलेल्या मुलाचा मृत्यू |Death of a child who went swimming

शिराळा,ता.३०: येथील संस्कार दत्तात्रय लोहार( वय १२) रा लोहार गल्ली या शाळकरी मुलाचा बिरोबा डोह येथील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज रविवारी सकाळी १२वाजण्याच्या सुमारास घडली. एकुलत्या एका मुलाचा मृत्यू झाल्याने लोहार कुटुंबीयांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोहायला गेलेल्या मुलाचा मृत्यू |Death of a child who went swimming

याबाबत  उमेश ब्रह्मदेव लोहार यांनी शिराळा पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे. शिराळा पोलीसांकडून व घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, आज रविवारी १२वाजण्याच्या सुमारास संस्कार  हा घरी कोणाला काही न सांगता गल्लीतील रेहान कादर नालबंद ( वय १०)  या मित्रा सोबत मोरणा नदी वरील बिरोबा डोह येथे आंघोळीला गेला होता. त्यांनी जाताना सोबत टायर ट्यूब नेली होती. प्रथम रेहान हा ट्यूब वरून पोहत होता. नंतर ट्यूब संस्कारला देणार होता. रेहान पोहत असताना संस्कार हा काठावर पाण्यात होता. पोहत असताना  काही वेळाने रेहानने  पाठीमागे  पाहिले असता त्यास संस्कार दिसला नाही.  त्याने ही माहिती गल्लीत व शेजारी मासे मारणाऱ्या लोकांना सांगितली. त्यावेळी संस्कारला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला असल्याचा संशय आल्याने बापू मोहिते, दास लोहार, राज पाटील, वीरेंद्र पाटील, जितेंद्र गोसावी या तरुणांनी त्यास शोधण्याचा प्रयत्न केला. एक तासानंतर संस्कारचा मृतदेह  दास लोहार याच्या हाती लागला. संस्कार ज्या ठिकाणी पाण्यात उभा होता त्या  ठिकाणाहून काही अंतरावर खोल खड्डा होता. त्यास पोहता येत नसल्याने  खोल खड्यात पाय गेल्याने पाण्यात बुडला. 

पोहायला गेलेल्या मुलाचा मृत्यू |Death of a child who went swimming

संस्कार हा येडेनिपाणी ता.वाळवा येथील प्राथमिक आश्रम शाळेत  इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत होता. गेले दोन वर्षापासून त्या शाळेत शिकत होता. परीक्षा संपल्याने सुट्टी लागल्याने घरी शिराळा येथे आला होता. शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात दोन बहिणी, आई,वडील ,आजी असा परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार बी.जी कुंभार करत आहे.

पोहायला गेलेल्या मुलाचा मृत्यू |Death of a child who went swimming

Post a Comment

0 Comments