BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शाळकरी मुलावर गव्याचा हल्ला | Cow attack on school boy

                             घेतलं शिंगावर घेतलं पण  कपड्यावर निभावलं 

शाळकरी मुलावर गव्याचा हल्ला | Cow attack on school boy



शाळकरी मुलावर गव्याचा हल्ला | Cow attack on school boy


शाळकरी मुलावर गव्याचा हल्ला | Cow attack on school boy

शिराळा .ता.२२: सकाळी ९ ची वेळ . शिवारात गव्याची एन्ट्रीने बघ्यांची गर्दी वाढली . काहींनी त्यास हुसकावण्याचा प्रयत्न केल्याने तो बिथरला . त्या बिथरलेल्या अवस्थेत गव्यान  शाळकरी मुलाला  शिंगावर घेतलं पण त्याचे नशीब बलवत्तर म्हणून कपड्यावर निभावलं अन सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला असा थरारक प्रकार शिराळा तालुक्यातील पुनवत येथे घडला. 

शाळकरी मुलावर गव्याचा हल्ला | Cow attack on school boy

      याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी पुनवत येथे प्राथमिक शाळेच्या पाठीमागील शिवारात  आज सकाळी नागरिकांनी गवा आल्याचे पाहिले .हे  समजताच बघ्यांनी एकच गर्दी केली.  शेतात बसलेल्या गव्याला काहींनी हुसकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बिथरलेल्या गव्याने तिथे असलेल्या आदित्य  प्रशांत पाटील या शाळकरी विद्यार्थ्यांवर हल्ला केला .त्यामध्ये  गव्याचे टोकदार शिंग त्याच्या कपड्यात अडकून कपडे फाटले व त्याला गव्याने दूरवर फेकले. या हल्ल्यात त्याला कोणतीही जखम झाली नाही पण  उचलून फेकल्याने  त्यास मुक्का मार लागला आहे. दरम्यान गव्याची  माहिती मिळताच  वनक्षेत्रपाल महंतेश बगले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल चंद्रकांत देशमुख ,वनरक्षक प्रकाश पाटील, वनकर्मचारी अमर पाटील, तानाजी खोत,  पोलीस पाटील बाबासाहेब वरेकर, संजय पाटणकर ,चंद्रकांत पाटील, मारुती पाटील  यांनी घटनास्थळी  भेट देत  गर्दीला पांगवले . ग्रामपंचायतीने ध्वनिक्षेपकावरून शेतकऱ्यांनी शेतात वावरतांना काळजी घेण्याची सूचना दिली आहे. दरम्यान आदित्यच्या शरीरावर गव्याच्या शिंगाचे ओरखडे असून त्याला उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यास मोठ्या प्रमाणात कोणत्या ही प्रकारची इजा झालेचे  नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. 

शाळकरी मुलावर गव्याचा हल्ला | Cow attack on school boy

गवा असणाऱ्या परिसरात मका उंच असल्याने तो कुठे आहे हे सांगणे कठीण आहे. तो त्या परिसरातून अजून  बाहेर गेल्याचे दिसला  नसल्याने  खबरदारी म्हणून आम्ही या परिसरात गव्यावर लक्ष ठेवून आहे. 

प्रकाश पाटील वनरक्षक 

शाळकरी मुलावर गव्याचा हल्ला | Cow attack on school boy

 तीन वर्षात पाच हल्ले

७ ऑक्टोंबर २०२१ रोजी मणदुर पैकी सिद्धेश्वरवाडी येथील शेतात आलेल्या गव्याने विठ्ठल हरिबा कुले व ज्ञानदेव साधू लाखन  या दोघांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. 

२४ फेब्रुवारी २०२२ रोजी उसात असणाऱ्या गव्याने सुर्यकांत पाटील व शिवाजी कुंभार या दोन शेतकऱ्यावर गव्याने हल्ला करून त्यांना जखमी केलं होत.

आज २२ एप्रिल २०२३ ला पुनवत येथील आदित्य  प्रशांत पाटील या शाळकरी मुलावर हल्ला केला मात्र तो थोडक्यात बचावला .

शाळकरी मुलावर गव्याचा हल्ला | Cow attack on school boy

 











Post a Comment

0 Comments