जाणून घ्या ग्रामपंचायत,नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि बाजार समितीची माहिती
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बाजार समिती निवडणूक |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
चित्राताई वाघ आज शिराळ्यात |Chitratai vagh in Shirala टुडे
चित्राताई वाघ आज शिराळ्यात |Chitratai vagh in Shirala today
शिराळा ,ता.१५:भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ ह्या शिराळा येथे उद्या रविवार ता.१६ रोजी येत आहेत. त्या निमित्ताने बुथ सशक्तीकरण अभियान व महिला मेळांव्याचे सकाळी ११ वाजता लकी मंगल कार्यालय आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सांगली बँक संचालक सत्यजित देशमुख व भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सम्राट महाडीक यांनी दिली.
चित्राताई वाघ आज शिराळ्यात |Chitratai vagh in Shirala today
यावेळी बोलताना ते म्हणाले, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांचे भाजपा बुथ सशक्तीकरण अभियान अंतर्गत संपुर्ण राज्यामध्ये दौरा सुरु आहे. त्यानिमित्ताने शिराळा विधान मतदार संघाच्या दौऱ्यावर त्या येत आहेत. शिराळा येथे बुथ सशक्तिकरण अभियान अंतर्गत बुथ प्रतिनिधी मिटिंग व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या रविवारी सकाळी ११ वाजता लकी मंगल कार्यालय शिराळा येथे हा कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावेअसे आवाहन देशमुख व महाडिक यांनी केले आहे.
चित्राताई वाघ आज शिराळ्यात |Chitratai vagh in Shirala today
0 Comments