रिळे येथील अपघातात एक ठार एक जखमी | One killed and one injured in an accident in रिलेय
रिळे येथील अपघातात एक ठार एक जखमी | One killed and one injured in an accident in Riley
शिराळा ,ता. ३ रिळे (ता.शिराळा) येथे कोकरूड -शिराळा या मुख्यरस्त्यावर मोटरसायकल घसरून झालेल्या अपघात राजाराम गोविंदा खोत ( वय ४४ ) हे जागीच ठार झाले तर त्याची मावशी लक्ष्मी धोंडीबा पाटील ( रा.शिवारे ता.शाहुवाडी) या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मयत राजारामचा भाऊ विष्णु गोविंदा खोत (वय ४८) रा. अस्वलेवाडी यांनी शिराळा पोलिसात वर्दी दिली आहे.
रिळे येथील अपघातात एक ठार एक जखमी | One killed and one injured in an accident in Riley
याबबत शिराळा पोलीस ठाण्यातून व घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, आज अस्वलेवाडी येथे मयत राजाराम यांचे चुलते नामदेव विठु खोत यांचे उत्तरकार्य होते. त्यासाठी त्याची मावशी लक्ष्मी धोंडीबा पाटील ह्या अस्वलेवाडी येथे आल्या होत्या. उत्तरकार्याचा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना घरी शिवारे येथे सोडण्याण्यासाठी राजाराम मावशी लक्ष्मी सह निघाले होते. दुपारी तीन वाजण्याच्या रिळे हद्दीत शिराळा ते कोकरूड या मुख्य रस्त्यावर उत्तम महिपती यादव याचे घरासमोर रस्त्यावर मोटारसायकल घसरून अपघात झालेला. ही माहिती मिळताच विजय नारायण खोत, राजाराम यशवंत खोत, तानाजी ज्ञानु खोत हे अपघात झालेल्या ठिकाणी गेले. त्यावेळी राजाराम हे रस्त्याच्या डाव्या बाजुस साईडपट्टीवर बेशुध्द अवस्थेत पडलेले होते. दुसऱ्या बाजूस मावशी लक्ष्मी पडल्या होत्या. त्यांच्या जवळ मोटारसायकलजवळ पडलेली होती. लक्ष्मी ह्या ही गंभीर जखमी झाल्याने त्यांना कोल्हापुरला सीपीआर येथे रुग्णवाहिकेने नेण्यात आले. राजाराम यास उपजिल्हा रुग्णालय शिराळा येथे आणले असता डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे सांगितले. पुढील तपास सहायक पोलीस फौजदार शिवाजी पाटील करत आहेत. राजाराम यांच्या पश्चात पत्नी,तीन मुली,भाऊ, भावजय ,पुतण्या ,एक बहिण असा परिवार आहे.
रिळे येथील अपघातात एक ठार एक जखमी | One killed and one injured in an accident in Riley
उत्तरकार्याला आलेल्यांच्यावर दहन करून जाण्याची वेळ
राजाराम खोत यांच्या चुलत्याचे निधन झाले.त्यांचे आज उत्तर कार्य होते. सकाळी उत्तरकार्य झाले आणि दुपारी राजाराम यांचे अपघाती निधन झाले . त्यांची मावशी गंभीर जखमी आहे. त्यामुळे पहिल्या या दुःखातून सावरण्याआधी खोत कुटुंबीयावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला . नामदेव खोत यांच्या उत्तरकार्याला आलेल्या नातवाईकांच्यावर त्यांचा पुतण्या राजाराम याच्यावर दहन करून जाण्याची वेळ आली.
रिळे येथील अपघातात एक ठार एक जखमी | One killed and one injured in an accident in Riley
सोडायला गेला तो कायमचाच
राजाराम यांच्या घरा पासून अवध्या दोन किलोमीटरवर त्यांचा अपघात झाला. मावशीला सोडायला गेला तो परत न येण्यासाठी कायमचाच गेला. केवळ दोन किलोमीटर अंतरावर राजारामवर काळाने घाला घटल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
रिळे येथील अपघातात एक ठार एक जखमी | One killed and one injured in an accident in Riley
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments