बेलदारवाडीत आग लागून चार लाखांचे नुकसान | 4 lakhs loss due to fire in Beldarwadi
बेलदारवाडीत आग लागून चार लाखांचे नुकसान | 4 lakhs loss due to fire in Beldarwadi
शिराळा : बेलदारवाडी ता.शिराळा येथे अचानक लागलेल्या आगीत गवताच्या सात गंज्या व दोन जनावरांचे शेड जाळून खाक झाल्याने ९ जणांचे सुमारे चार लाख रूपयाचे नुकसान झाले. यात कोणती ही जीवित हानी झाली नाही. आग वेळीच आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
बेलदारवाडीत आग लागून चार लाखांचे नुकसान | 4 lakhs loss due to fire in Beldarwadi
ही घटना आज रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या बाबतीत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आज दुपारच्या दोनच्या सुमारास बेलदारवाडी येथील एकनाथ कोंडीबा घारगे,विलास गंगाराम घारगे, पोपट गंगाराम घारगे, कविता शिवाजी घारगे, आनंदा कोंडीबा घारगे, मारूती धोंडीबा घारगे,भानुदास विष्णू मस्कर यांच्या कडबा व गवताच्या गंजीस अचानक आग लागली. आग व धुराचे लोट उसळल्याचे त्या परिसरात असणाऱ्या लोकांना दिसले. मात्र दुपारची वेळ असल्याने रखरखते ऊन व वा-याच्या मोठा झोत असल्याने आगीने लगेच रुद्र रूप धारण केले. त्यामुळे आगीचा भडका उसळला. त्यामुळे गवताच्या गंजी शेजारी असणाऱ्या आनंदा कोंडीबा घारगे,भानुदास मस्कर यांच्या जनावरे शेड जाळून खाक झाले. तर त्या शेडच्या जवळ असणाऱ्या दोन घराचे किरकोळ नुकसान झाले आहे. हि आग विझवण्यासाठी विश्वास कारखाना व इस्लामपूर येथील नगरपालिकेची अग्निशामन गाडी मागवण्यात आली. गावातील नागरिक व सरपंच सुधीर बिळासकर, पोलिस पाटील योगेश मस्कर, हंबीर शेवाळे,पांडुरंग मदने,माजी सरपंच धर्मेंद्र शेवाळे,शिवाजी मस्कर यांच्या सह ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. याचा अद्याप पंचनामा झाला नव्हता.
बेलदारवाडीत आग लागून चार लाखांचे नुकसान | 4 lakhs loss due to fire in Beldarwadi
म्हणून त्यांचे जीव वाचले
शेड जवळ आग येताच ग्रामस्थांनी शेड मधील तीन जनावरांची दावी तोडून त्यांची मुक्ता केली. त्यामुळे या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर दुसऱ्या शेड मधील जनावरे दुसरीकडे मांडवात बांधल्याने ती वाचली.
बेलदारवाडीत आग लागून चार लाखांचे नुकसान | 4 lakhs loss due to fire in Beldarwadi
गावाने केला ८० हजार लिटर पाण्याचा मारा
अग्निशामन गाडी यायला वेळ लागल्याने व भर दुपारी लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी नळपाणी पुरवठा सुरु करून बादली, घागर व कळशी यांचा वापर करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ८० हजार लिटरची पाण्याची टाकी संपली पण आग आटोक्यात आली नाही.शेवटी अग्निशमन गाडी आल्यानंतर आग आटोक्यात आली. ही आग आटोक्यात आली नसती तर गावात घरा शेजारी घरे असल्याने मोठा अनर्थ घडला असता.
बेलदारवाडीत आग लागून चार लाखांचे नुकसान | 4 lakhs loss due to fire in Beldarwadi
रात्र जागून काढण्याची वेळ
त्या गंज्या जवळ इतर लोकांच्या ही गंज्या व घरे असल्याने लोकांची आग विझवण्यासाठी जीवाचा आटापिटा केला. आग आटोक्यात आणण्यासाठी सात तास लागले. मात्र गंज्या मोठ्या असल्याने आग रात्रभर धुमसत राहणार असल्याने लोकांना घरे व इतर गवताच्या गंज्या वाचवण्यासाठी रात्रभर जागावे लागणार आहे.
बेलदारवाडीत आग लागून चार लाखांचे नुकसान | 4 lakhs loss due to fire in Beldarwadi
जनावरांना काय घालायचे
सात शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी जमा केलेला चारा जाळून खाक झाल्याने आता त्यांना पावसाळ्यात काय खायला घालायचे हा हा प्रश्न त्या शेतकऱ्या समोर पडला असून त्यांना इतर शेतकऱ्यांनी चाऱ्याची मदत करण्याची गरज आहे.
बेलदारवाडीत आग लागून चार लाखांचे नुकसान | 4 lakhs loss due to fire in Beldarwadi
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments