अपघातात बहिण भावाचा मृत्यू | Brother and sister died in an accident
अपघातात बहिण भावाचा मृत्यू | Brother and sister died in an accident
शिराळा: भटवाडी ता. शिराळा येथे शिराळा ते करमाळा रस्त्यावर मोटारसायकल व मालवाहतूक ॲपेरिक्षा यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भिषण अपघातात राजेंद्र दिनकर महाडीक (वय ३८) रा. कासेगाव व जयश्री जयकर पाटील (वय ४०) रा.शेणे (ता वाळवा) या सख्या बहीण भावाचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान घटना घडली.
अपघातात बहिण भावाचा मृत्यू | Brother and sister died in an accident
अपघातात बहिण भावाचा मृत्यू | Brother and sister died in an accident
याबाबत मयत राजेंद्रचे चुलते आनंदा रामचंद्र महाडिक यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे. घटनास्थळावरून व पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, श्रीमती जयश्री पाटील व त्यांचा भाऊ राजेंद्र महाडीक हे मोटार सायकल नंबर एम एच ०९ एजे ९५८ या मोटार सायकल वरून शिराळ्याला कामानिमित्त गेले होते. शिराळयाकडून परत कासेगावकडे जात होते. मालवाहतूक ॲपे रिक्षा नंबर एम एच ४३ एडी ४९८० ही करमाळे कडून शिराळयाकडे येत होती. दरम्यान भटवाडी गावा पासून काही अंतरावर उतारावर मोटार सायकल व मालवाहतूक ॲपे रिक्षा यांची धडक झाली .त्यात मोटारसायकल वरील राजेंद्र महाडिक व जयश्री पाटील हे बहिण भाऊ रस्त्यावर पडले. दोघांच्या ही डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटनास समजताच भटवाडी व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. मालवाहतूक ॲपे रिक्षा रस्त्या कडेला पलटी झाली होती.
अपघातात बहिण भावाचा मृत्यू | Brother and sister died in an accident
जयश्री पाटील ह्या शेणे येथे अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करत होत्या. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी आहे. राजेंद्र हा शेती करत होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले व भाऊ, भावजय असा परिवार आहे.प्रहार संघटनेचे अध्यक्ष बंटी नांगरे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी दोन्ही मृतदेह शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदना साठी नेले. डॉ.अनिरुद्ध काकडे यांनी शवविच्छेदन केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर करीत आहेत. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अपघातात बहिण भावाचा मृत्यू | Brother and sister died in an accident
रुग्णवाहिका चालकानेच हंबरडा फोडला
अपघाताची घटना घडताच उपस्थित नागरिकांनी १०८ रुग्णवाहिकेला फोन केला. शिराळा व कोकरुड येथील रुग्णवाहिका इतरत्रं गेल्याने कासेगाव येथील रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. वाहन चालक सौरभ महाडिक हे अपघातातील जखमींना उचलत असताना त्यांचा चेहरा पाहून त्याने हंबरडा फोडला. कारण ते दोन्ही मृतदेह त्याचा चुलत बहिण भावाचे होते.
अपघातात बहिण भावाचा मृत्यू | Brother and sister died in an accident
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments