BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

निगडी येथील दरोडेखोर अखेर जेरबंद | The robber from Nigdi was finally arrested

निगडी येथील दरोडेखोर अखेर जेरबंद | The robber from Nigdi was finally arrested



निगडी येथील दरोडेखोर अखेर जेरबंद | The robber from Nigdi was finally arrested


निगडी येथील दरोडेखोर अखेर जेरबंद | The robber from Nigdi was finally arrested

शिराळा : निगडी (ता. शिराळा) येथील  दरोडा टाकून, घरातील महिलेच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने काढताना हत्याराने डोक्यात मारहाण केल्याने, तिच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या फरार टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले.

निगडी येथील दरोडेखोर अखेर जेरबंद | The robber from Nigdi was finally arrested



 हा दरोडा पाच जणांच्या टोळीने घातला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून, टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दरोड्यात चोरलेले ३ लाख ७० हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मगऱ्या अशोक ऊर्फ अजीतबाबा काळे (वय १९, रा. येवलेवाडी, ता. वाळवा), तक्षद ऊर्फ स्वप्नील पप्या काळे (२६, रा. कार्वे, ता. वाळवा) आणि गोपी ऊर्फ टावटाव त्रिशुल ऊर्फ तिरश्या काळे (१९, रा. ऐतवडे खु., ता. वाळवा यांचा समावेश आहे. दरम्यान दरोड्याच्या घटनेत सदाशिव दादू साळुंखे आणि हिराबाई सदाशिव साळुंखे हे वृध्द दांपत्य गंभीर जखमी झाले होते. त्यातील उपचारा दरम्यान  हिराबाई साळुंखे यांचा मृत्यू झाला आहे. 

निगडी येथील दरोडेखोर अखेर जेरबंद | The robber from Nigdi was finally arrested

डॉ. तेली यांनी दिलेली माहिती अशी, की निगडी येथील खडी खालील वस्तीवर सदाशिव दादू साळुंखे व हिराबाई सदाशिव साळुंखे हे वयोवृद्ध दांपत्य राहत होते. त्यांच्या घरावर १७ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.  झोपेत असलेल्या  हिराबाई साळुंखे यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरट्यांनी जबरदस्तीने काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्याला दोघांनी विरोध केल्याने हल्लेखोरांनी सदाशिव व हिराबाई यांना कोणत्यातरी हत्याराने डोक्यात मारहाण केली आणि ते तेथून पसार झाले. जखमी हिराबाई यांचा उपचार सुरु असताना  इस्लामपूर येथे मृत्यू झाला. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिस पथके जिल्ह्यासह अन्यत्रही पाठविण्यात आली होती. 

निगडी येथील दरोडेखोर अखेर जेरबंद | The robber from Nigdi was finally arrested

दरम्यान, इस्लामपूर येथील गस्तीवर असणाऱ्या पोलिस पथकास हा दरोडा मगऱ्या काळे व त्यांच्या टोळीने घातला असल्याची माहिती मिळाली. तसेचमगऱ्या हा लक्ष्मी फाटा, इस्लामपूर रस्ता परिसरात असल्याचे समजले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी सापळा रचला. काही वेळाने तेथे तीन युवक संशयास्पद हालचाली करताना आढळल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याचे दागिने, रोख रक्कम; तसेच एक दुचाकी असा मुद्देमाल मिळाला. याबाबत संशयितांकडे विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी निगडी येथील एका घरात मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकून दांपत्यास मारहाण करुन मुद्देमाल लुटल्याची कबुली दिली. हा दरोडा पाच जणांनी मिळून टाकला असून, यामधील दोघे अद्यापी पसार आहेत. दरोड्यासह कासेगाव आणि इस्लामपूर येथील घरफोडीचे गुन्हेही उघडकीस आले आहेत. आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे डॉ. तेली यांनी सांगितले. 

निगडी येथील दरोडेखोर अखेर जेरबंद | The robber from Nigdi was finally arrested

दरम्यान, कारवाईत एलसीबीचे निरिक्षक सतीश शिंदे, शिराळा ठाण्याचे निरिक्षक सुरेश चिल्लावार, एलसीबीचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे, सुनील चौधरी, बिरोबा नरळे, संदिप गुरव, सागर लवटे, अनिल कोळेकर, संतोष गळवे, विक्रम खोत, जितेंद्र जाधव, सागर टिंगरे, शुभांगी मुळीक, अंकुश ढवळे यांचा सहभाग होता. 

निगडी येथील दरोडेखोर अखेर जेरबंद | The robber from Nigdi was finally arrested


शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------









Post a Comment

0 Comments