कालव्या वरील पुल कोसळला | The bridge over the canal collapsed
कालव्या वरील पुल कोसळला | The bridge over the canal collapsed
शिराळा,ता. १५: कुसाळेवाडी (ता.शिराळा) येथील वारणा डावा कालव्यावरील पुल कोसळला असल्याने या वाडीतील लोकांना कालव्याच्या अलीकडे व पलीकडे असणाऱ्या शेतात व वस्तीवर जाण्यासाठी पणुंब्रे वारुण मार्गे ये जा करण्यासाठी जवळपास दहा किलोमीटर प्रवास करण्याची वेळ आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही घटना सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
कालव्या वरील पुल कोसळला | The bridge over the canal collapsed
कालव्या वरील पुल कोसळला | The bridge over the canal collapsed
कुसळेवाडी ही जवळपास दीड हजार लोकवस्ती असणारे गाव आहे. या गावा जवळून वारणा डावा कालवा गेल्याने या गावची शेती व लोकवस्ती कालव्याच्या दोन्ही बाजूस आहे. कालव्याच्या पलीकडे कुसळेवाडीचे सुमारे दीडशे एकर क्षेत्र आहे. त्यामुळे लोकांना कालव्याच्या अलीकडे व पलीकडील लोकवस्ती व शेतीत जाण्यासाठी चाळीस वर्षापूर्वी कालव्यावर पुल बांधण्यात आला आहे. सन २०१४ पासून गेल्या ९ वर्षापासून कालव्याची दुरवस्था झाली होती. पुलाच्या दगडी पिलरचा काही भाग कोसळला होता. त्याच्या दुरुस्ती बाबत पाटबंधारे विभागाकडे ग्रामपंचायतने ९ वर्षे वारंवार पत्रव्यवहार केला होता. मात्र त्या बाबत काहीच हालचाल झाली नाही. सध्या शेतीसाठी वारणा डावा कालव्यातून पाणी सोडले आहे. त्या पाण्याच्या सततच्या प्रवाहामुळे कमकुवत झालेलें दगडी पिलर ढासळल्याने पुल मध्यभागी कोसळला .आज सकळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास पुलाच्या शेजारी असणाऱ्या घाटावर महिला कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना व ग्रामस्थांना पुलाच्या बाजूने काही तरी पडल्याचा मोठा आवाज आला. त्यांनी पुलाकडे धाव घेतली पुल कोसळलेला दिसला. त्यामुळे कालव्याच्या अलीकडे पलीकडे जाण्याचा गावच्या लोकांच्या जवळचा संपर्क तुटला आहे.
कालव्या वरील पुल कोसळला | The bridge over the canal collapsed
दहा किलोमीटर पायपीट होणार
आम्ही या पुलाच्या दुरुस्ती बाबत गेली ९ वर्षे पाठपुरावा करत होतो. पण आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही. कालव्याच्या पलीकडे आमची जवळपास दीडशे एकर जमीन आहे. त्यामुळे त्या ठिकाणी शेतीच्या कामासाठी लागणारी औजारे घेवून जाण्यासाठी आता आम्हाला पणुंब्रे वारुण मार्गे जवळपास दहा किलोमीटर ये -जा करण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर पर्यायी पुलाची व्यवस्था करावी.
श्रीकृष्ण कुसळे सरपंच कुसळेवाडी
कालव्या वरील पुल कोसळला | The bridge over the canal collapsed
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments