शेणे येथे चौकात एकाचा भोसकून खून| One was stabbed to death in the square at Shene
शेणे येथे चौकात एकाचा भोसकून खून| One was stabbed to death in the square at Shene
शेणे येथे चौकात एकाचा भोसकून खून| One was stabbed to death in the square at Shene
शिराळा : वाळवा तालुक्यातील शेणे येथे पूर्व वैमनस्यातील भांडणातून एकाचा कोयता व सुऱ्याने भोसकून खून झाल्याची घटना घडली. काल भर दुपारी घटना घडल्याने शेणे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. यावेळी कासेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली. या परिसरातील या तीन महिन्यांतील हा दुसरा खून आहे. येथीलच अत्तार नामक व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता.
शेणे येथे चौकात एकाचा भोसकून खून| One was stabbed to death in the square at Shene
शेणे येथील जोतिबा मंदिराच्या चौकात ही घटना घडली. राजेंद्र जयवंत पाटील (वय ४९) असे या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रघुनाथ सुबराव पाटील, हणमंत सुबराव पाटील, (दोघे रा. शेणे, ता. वाळवा), नीलेश अशोक सपकाळ (रा. कासेगाव, ता वाळवा) व एक अल्पवयीन आशा चौघांवर कासेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राजेंद्र पाटील ( वय १९) याने कासेगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे.
शेणे येथे चौकात एकाचा भोसकून खून| One was stabbed to death in the square at Shene
याबाबत कासेगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेणे येथील मृत राजेंद्र पाटील हे गावात शेती करतात. त्यांचे संशयितांच्या बरोबर पूर्वी क्षुल्लक कारणावरून वाद झाले होते. आज दुपारी येथील ज्योतिर्लिंग मंदिरासमोर राजेंद्र जयवंत पाटील हे बाकड्यावर बसले होते. त्यावेळी चारही संशयित मोटारसायकलवरून त्याठिकाणी आले. तेथे त्यांची राजेंद्र पाटील यांच्याशी जुन्या भांडणावरून बाचाबाची झाली,भांडणाचे परिवर्तन हाणामारीत झाले. यावेळी चौघांपैकी रघुनाथ सुबराव पाटील याने राजेंद्र पाटील यांच्या छातीत चाकू मारला. राजेंद्र पाटील यांच्या हृदयाला चाकूचे टोक लागल्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात जागेवरच कोसळले. यावेळी राजेंद्र पाटील यांच्या मित्र व नातेवाईकांनी कासेगाव येथील दवाखान्यात त्यांना नेले. त्यानंतर कऱ्हाड येथील कृष्णा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. दवाखान्यात नेत असताना रक्तप्रवाह जास्त झाल्यामुळे त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.दरम्यान, या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण तयार झाले होते. कासेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता आरोपी तिथून पसार झाले होते. राजेंद्र पाटील यांचा मुलगा विनायक पाटील याने कासेगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली. कासेगाव पोलिसांनी चारही संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत. सहायक पोलिस निरीक्षक अविनाश मते तपास करीत आहेत.
शेणे येथे चौकात एकाचा भोसकून खून| One was stabbed to death in the square at Shene
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments