ट्रॅक्टर अपघातात चालक ठार |Driver killed in tractor accident
ट्रॅक्टर अपघातात चालक ठार |Driver killed in tractor accident
शिराळा :बिऊर पैकी शांतीनगर ( ता.शिराळा) येथील पाझर तलावाजवळील कोकरूड शिराळा या मुख्य वळण रस्त्यावर उतारास ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चा हुक तुटल्याने आपला जीव वाचविण्यासाठी चालत्या ट्रॅक्टर मधून उडी मारली असता ट्रॉली च्या चाकाखाली सापडल्याने चालक आकाश लहू खंडागळे ( वय २० ), सद्या रा.आरळा , मुळगाव पुनंदगाव , ता.मादळगाव , जि. बीड) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना आज बुधवार रोजी सकाळी ९:४५ च्या पूर्वी घडली.याबाबत लहू शामराव खंडागळे यांनी शिराळा पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे.
ट्रॅक्टर अपघातात चालक ठार |Driver killed in tractor accident
याबाबत शिराळा पोलीस ठाणे व घटनास्थळा वरून समजेलेली माहिती अशी, मयत आकाश , त्याचे वडील लहू खंडागळे, आई उषा , भाऊ सुरज यांचा ऊसतोड व उस वाहतुक व्यवसाय आहे. सध्या ते आरळा येथे राहण्यास आहेत. आरळा येथील गणपती भाष्टे यांच्या शेतातील ऊसतोड करून ट्रॅक्टर ( क्रमांक एम एच २३ बी ६२२८) च्या दोन ट्रॉली मध्ये ऊस भरून कारखान्याकडे चालले होते. हा ट्रॅक्टर बिऊर पाझर तलावा जवळ आला असता वळण व उतारास ट्रॉली व ट्रॅक्टर ला जोडणारा हुक तुटला . यामुळे आपला जीव वाचविण्यासाठी चालक आकाश याने चालू ट्रॅक्टर मधून उडी मारली. यावेळी आकाश हा ऊसाने भरलेल्या त्याच्याच ट्रॉलीच्या चाकाखाली सापडला. चाक त्याच्या डोकीवरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत लहू शामराव खंडागळे यांनी शिराळा पोलीस ठाण्यात वर्दी दिली. पुढील तपास हवालदार एन. जी. पवार हे करीत आहेत.
ट्रॅक्टर अपघातात चालक ठार |Driver killed in tractor accident
हा पाचवा अपघात
तीन महिन्यात शिराळा कोकरूड या मुख्य रस्त्यावर शिराळा, बिऊर ,शांतीनगर , अस्वलेवाडी ,आणि रिळे या ठिकाणी ट्रॅक्टर अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला आहे.यामध्ये चार युवकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
ट्रॅक्टर अपघातात चालक ठार |Driver killed in tractor accident
दोन तास मृतदेह चाकाखाली
ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या चाकाखाली आकाशचे डोके सापडले असल्याने मृतदेह बाहेर काढता येत नव्हता. दुसऱ्या ट्रॅक्टरने ट्रॉली पाठीमागे ओढून चाकाखाली सापडलेला मृतदेह सुमारे दोन तासाने बाहेर काढण्यात आला. डोकं चाकाखाली सापडल्याने चेहऱ्याच्या भागाचा चक्काचूर झाल्याने बघणाऱ्याच्या अंगाचा थरकाप उडत होता. घटनास्थळी हृदय द्रावक चित्र होते.
ट्रॅक्टर अपघातात चालक ठार |Driver killed in tractor accident
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments