रमाई आवास योजनेत जिल्ह्यात शिराळा तालुका प्रथम | Shirala Taluka first in Ramai Awas Yojana in the district
रमाई आवास योजनेत जिल्ह्यात शिराळा तालुका प्रथम | Shirala Taluka first in Ramai Awas Yojana in the district
रमाई आवास योजनेत जिल्ह्यात शिराळा तालुका प्रथम | Shirala Taluka first in Ramai Awas Yojana in the district
शिराळा ,ता.१३:शिराळा तालुक्याने रमाई आवास योजनेत सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकविला असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते गटविकास अधिकारी संतोष राऊत व पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
रमाई आवास योजनेत जिल्ह्यात शिराळा तालुका प्रथम | Shirala Taluka first in Ramai Awas Yojana in the district
जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे हा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. महाराष्ट्र शासनाने सन २०२१-२२ मध्ये राबविलेल्या महा आवास योजनेत शिराळा तालुक्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. मागील वर्षी २० नोव्हेंबर २०२१ ते ३१ मे २०२२ या कालावधीत सदर अभियान राज्यात राबविण्यात आले होते. या अभियानात तालुक्याने आघाडी घेत सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. रमाई आवास योजनेत मांगले जिल्हा परिषद गटाचा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत ग्रामपंचायत पाडळीवाडीचा जिल्ह्यात द्वितीय तर ग्रामपंचायत येळापूरचा तृतीय क्रमांक आला आहे. या ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांचाही सन्मान पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.
रमाई आवास योजनेत जिल्ह्यात शिराळा तालुका प्रथम | Shirala Taluka first in Ramai Awas Yojana in the district
यावेळी गटविकास अधिकारी संतोष राऊत म्हणाले प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजना या शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याच्या योजना असून सदर योजनेत प्रगती साधण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. पंचायत समितीचे सर्व विस्तार अधिकारी, घरकुल विभागाचे सर्व कर्मचारी तसेच सर्व ग्रामपंचायत चे सरपंच व ग्रामसेवक हे घरकुल मंजूर करण्यासाठी व बांधकाम पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लाभार्थ्यांना वारंवार भेटी देऊन त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांना वेळेत घरकुलाचे हप्ते वितरित करणे, रोजगार हमी योजनेचे अनुदान वेळेत मिळवून देणे यासाठी सर्वांनी अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नामुळे तालुक्याला हे यश प्राप्त झाले. यासाठी आमदार मानसिंग नाईक, पंचायत समितीचे तत्कालीन सभापती, उप सभापती, सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी घरकुले पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले.
रमाई आवास योजनेत जिल्ह्यात शिराळा तालुका प्रथम | Shirala Taluka first in Ramai Awas Yojana in the district
यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश ओसवाल, प्रकल्प संचालक दीपक चव्हाण उपस्थित होते.
रमाई आवास योजनेत जिल्ह्यात शिराळा तालुका प्रथम | Shirala Taluka first in Ramai Awas Yojana in the district
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments