BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

फुलेंचे राष्ट्रीय स्मारक पुण्याच्या भिडे वाड्यात व्हावे | Phule's National Memorial should be in Pune's Bhide Wada

शिराळा,ता.२४: सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले व  क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक पुण्याच्या भिडे वाड्यात व्हावे अशा मागणीचे निवेदन तहसीलदार यांना शिराळा तालुका भारतीय दलित महासंघाच्यावतीने देण्यात आले. 

फुलेंचे राष्ट्रीय स्मारक पुण्याच्या भिडे वाड्यात व्हावे | Phule's National Memorial should be in Pune's Bhide Wada 

या निवेदनात म्हटले आहे, एक जानेवारी १८४ ८ रोजी  महात्मा ज्योतिबा फुले व  सावित्रीमाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी पुण्याच्या भिडे वाड्यात देशातील पहिली शाळा सुरू करून देशातील मनुवादी व्यवस्थेला शह दिला.  त्यांनी दलित, शेतकरी, कष्टकरी, मजूर, कामगार, व स्त्रियांच्या उद्धारासाठी, सामाजिक व शैक्षणिक परिवर्तनासाठी, मानवतेच्या न्याय व हक्कासाठी, कृतिशील परिवर्तनवादी लढा उभारून न्याय दिला. त्यांचे कार्य इतिहासात प्रेरणादायी असून शासन दरबारी मात्र त्यांच्या कार्याचा गौरव होताना दिसत नाही. ज्या भिडे वाड्यात फुले यांनी स्त्री शिक्षणाचे दरवाजे खुले केले, देशात पहिली शाळा सुरू केली त्या भिडे वाड्याची अत्यंत वाईट दुरावस्था झाली आहे.

फुलेंचे राष्ट्रीय स्मारक पुण्याच्या भिडे वाड्यात व्हावे | Phule's National Memorial should be in Pune's Bhide Wada 

  पुणे महानगरपालिकेच्या व महाराष्ट्र शासनाच्या उदासीनतेमुळे सदरचे ऐतिहासिक वास्तू नामशेष होण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास व सत्यशोधकी विचारसरणी जगासमोर मांडणाऱ्या क्रांतीबांच्या गौरवशाली इतिहासाची जाणीव ठेवून त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रातील उत्तुंग कार्याची दखल घेऊन पुण्याच्या भिडे वाड्यात फुले यांचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्यात यावे. या निवेदनावर दयानंद शिवजातक ,विनोद आढाव,दिलीप मोरे ,ओंकार शिवजातक, विनोद कांबळे, विशाल खांडेकर ,शशिकांत कांबळे, धनाजी तुपारे ,शशिकांत साठे यांच्या सह्या आहेत.

फुलेंचे राष्ट्रीय स्मारक पुण्याच्या भिडे वाड्यात व्हावे | Phule's National Memorial should be in Pune's Bhide Wada 

Post a Comment

0 Comments