कोकरूड येथील अपघातात बापलेकाचा मृत्यू | father and son died in an accident at Kokrood
कोकरूड येथील अपघातात बापलेकाचा मृत्यू | father and son died in an accident at Kokrood
कोकरुड ता. २४: कोकरुड ता. शिराळा येथे कराड-रत्नागिरी राज्य महामार्गावर वारणा नदीवरील कोकरूड- नर्ले पुलाजवळ कोकरूड हद्दीत रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलाच्या सवरक्षण काठड्यास धडकून झालेल्या अपघात बावडा (वकिलवस्ती) जि. पुणे येथील महेंद्र अशोक घोगरे (वय ३५) व आरव महेंद्र घोगरे (वय ४ ) हे दोघे बापलेक जागीच ठार झाले तर रुपाली महेंद्र घोगरे, शिवेंद्र महेंद्र घोगरे व रेणुका ऋषिकेश घोगरे हे तीन जखमी झाले आहेत.
कोकरूड येथील अपघातात बापलेकाचा मृत्यू | father and son died in an accident at Kokrood
याबाबत कोकरूड पोलिसांकडून व घटनास्थलावरून मिळालेली माहिती अशी की ऋषिकेश मोहन घोगरे (वय २३) रा. डावळ जि. पुणे हे स्वतःच्या मालकीची चारचाकी ब्रेझा गाडी नंबर एम एच ४२ ए एक्स ७३७२ घेऊन पत्नी रेणुका ऋषिकेश घोगरे, चुलत भाऊ महेंद्र अशोक घोगरे, रुपाली महेंद्र घोगरे,व आरव व शिवेंद्र महेंद्र घोगरे हे सर्वजण सकाळी ७ वाजता पुण्या वरून गणपतीपुळे, रत्नागिरी येथे देवदर्शना करिता निघाले होते. दुपारी १.३० सुमारास कोकरूड ता.शिराळा येथील वारणा नदीवरील कोकरूड-नर्ले पुलाजवळ आले असता ऋषिकेश याचा गाडीवरील ताबा सुटल्याने पुलाच्या संरक्षण काठड्यास गाडीची जोरदार धडक दिली. यामध्ये चालकाच्या बाजूस बसलेले महेंद्र व आरव हे जागीच ठार झाले. तर पाठीमागे बसलेले रुपाली, रेणुका व शिवेंद्र हे जखमी झाले आहेत. जखमींना कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. धडक डाव्या बाजूस बसल्याने चालक ऋषिकेश यास कोणत्याही प्रकारची इजा पोहचली नाही. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील करत आहेत.
कोकरूड येथील अपघातात बापलेकाचा मृत्यू | father and son died in an accident at Kokrood
धडक एवढी जोराची होती की पुलाचा कठडा व डिव्हायडर यामध्ये गाडीचा दरवाजा अडकून गाडी चालकाच्या बाजू कडील कठड्यास जाऊन पुन्हा धडकली यामध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र डिव्हायडर मुळे मोठी जावीत हानी टळली नाहीतर गाडी ५० फूट खाली शेतात गेली असती.मागील वर्षी १ जानेवारी रोजी याच ठिकाणी दुचाकी ५० फूट शेतात कोसळून झालेल्या अपघातात दोन ठार झाले होते. वर्षभराच्या फरकाने येथे आज पुन्हा अपघात घडला आहे.
कोकरूड येथील अपघातात बापलेकाचा मृत्यू | father and son died in an accident at Kokrood
या हेडिंगवर अथवा वरील फोटोवर क्लिक करून वाचा या अपघाताची सविस्तर बातमी
शिराळा तालुक्यातील ६० पैकी ५६ ग्रामपंचायतच्या उमेदवारांना गाव निहाय पडलेले मतदाना जाणून घ्या
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments