धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचाच विजय | The victory of people's power against wealth
धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचाच विजय | The victory of people's power against wealth
गिरजवडे गावच्या सुज्ञ मतदारांनी आपल्या मनातला सरपंच म्हणून मला निवडून देवून विकासाला साथ दिली आहे. ही उमेदवारी माझी नसून तुम्हा सर्वांची आहे हे समजून जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा लढा देत तुम्ही मनापासून काम केले. त्यामुळे तुमच्या आशीर्वादावर व जोतीबा देवाच्या कृपेने मला गिरजवडे गावचा लोकनियुक्त सरपंच होण्याचा मन मिळाला .त्या बद्दल मी सर्वांचे आभार मानणार नाही तर तुमच्या ऋणात राहून सदैव आपल्या गावच्या व सर्वसामन्य लोकांच्या विकासासाठी सरपंच म्हणून नव्हे तर आपला लोकसेवक म्हणून झटत राहील.
धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचाच विजय | The victory of people's power against wealth
मी मतदारांच्या घरी मला कामाची संधी द्या म्हणून जात असताना भरभरून पाठबळ मिळत होते.वडीलधाऱ्या लोकांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. मला बोलायचे बाळा आमचा आशीर्वाद तुलाच आहे. कितीही तुला विरोध करूदे तूच निवडून येणार असा मला आत्मविश्वास देत होते. या ज्योतिर्लिंगाच्या पावनभूमीमध्ये गिरजवडे ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक करण्याची परंपरा राखण्यासाठी ज्योतिर्लिंगाच्या पायथ्याशी दोन बैठका झाल्या. मात्र तो शब्द पाळला नाही .त्यामुळे सदस्य बिनविरोध झाले तरी सरपंच पदाची निवडणूक लागली .गावावर लादलेली ही निवडणूक गावातील जनतेला रुचली नाही .निवडणुकीने गावचे होणारे नुकसान व बिनविरोध झाली असती तर येणारा विकास निधी थांबला. याचं प्रत्युत्तर म्हणून जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतली आणि सर्वसामान्य कुटुंबातील माझ्यासारखे एका सामान्य कार्यकर्त्याला जनतेची सेवा करणाऱ्या कार्यकर्त्याला सरपंच पदी होण्याची संधी दिली . आज खऱ्या अर्थाने बळीराजाचं राज्य आलं असं मी म्हणेन.
धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचाच विजय | The victory of people's power against wealth
श्री ज्योतिर्लिंगाने मला निवडून देऊन लोकांनी दिलेला शब्द खरा ठरला. माझ्यावर विश्वास दाखवलेल्या सर्व सुज्ञ मतदार बंधू-भगिनींनी जेष्ठ नागरिकांनी व माझ्या सहकाऱ्यांनी मला मतदान रुपी आशीर्वाद देऊन मला प्रचंड मताने विजयी केलं. त्या सर्वांच्या ऋणात राहील. त्याच बरोबर गिरजवडे जनशक्ती ग्रामविकास पॅनेलला आमदार मानसिंगराव नाईक, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, रणधीर नाईक, सम्राटसिंह नाईक, विराज नाईक यांनी गावच्या विकासासाठी साथ दिली. मला गिरजवडे, मुळीकवाडी मोंडेवाडी येथील जनतेची सेवा करण्याची संधी दिली भविष्यात गिरजवडे गावच्या विकासासाठी कोणताही राजकीय मतभेद न ठेवता गावचा सेवक म्हणून प्रामाणिक काम करेन .त्यासाठी गावातील सर्व लोकांचे मला सहकार्य राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.
आपला लोकसेवक - सचिन देसाई
धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचाच विजय | The victory of people's power against wealth
कोकरूड येथील अपघातात बापलेकाचा मृत्यू | father and son died in an accident at Kokrood
या हेडिंगवर अथवा वरील फोटोवर क्लिक करून वाचा या अपघाताची सविस्तर बातमी
शिराळा तालुक्यातील ६० पैकी ५६ ग्रामपंचायतच्या उमेदवारांना गाव निहाय पडलेले मतदाना जाणून घ्या
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments