ऐन निवडणुकीत विरोधकाने केली " करणी" | The opposition did "Karni" in the election.
ऐन निवडणुकीत विरोधकाने केली " करणी" | The opposition did "Karni" in the election.
शिराळा तालुक्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा बोकाळली असून आपल्या विरोधकाचे पॅॅनेल निवडून येवू नये व त्यास तिकीट मिळू नये म्हणून विरोधकांच्या घरासमोर आणि शेतात लिंबू ,नारळ,,हळद, कुंकू सह नैवेद्य असा उतारा सोडण्यास सुरवात झाल्याने करणीचे प्रकार वाढू लागले आहेत. देवा मलाच सरपंच अथवा सदस्य पदाची तिकीट मिळूंंदे म्हणून अनेकांनी आपापल्या ग्राम दैवताला साकडे घातले आहे. शिराळा तालुक्यातील निवडणूक लागलेल्या एका गावातील चक्क ग्रामपंचायत समोर उतरा ठेवला असून तो उतारा ठेवणारा सी.सी.टी.व्हीत कैद झाला आहे. त्यामुळे या उताऱ्याची चर्चा गावात जोरात सुरु आहे.
ऐन निवडणुकीत विरोधकाने केली " करणी" | The opposition did "Karni" in the election.
शिराळा तालुक्यात ६० ग्रामपंचायतची निवडणूक लागली आहे. सरपंचपद थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने इच्छुकांची संख्याही वाढली आहे. काही गावात सरपंचपदाचे आरक्षण असल्याने योग्य उमेदवार व त्यासाठी लागणारे विविध जातीचे दाखले जमा करण्यासाठी गावातील प्रमुख नेत्यांना धावपळ सुरु आहे.उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या शेवटचा दिवस आहे. निवडणुकांसाठी ऑनलाइन सोबत आज पासून पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुभा निवडणूक आयोगाने दिल्याने इच्छुकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे ऑनलाईन मध्ये मागे पडलेल्या अनेकांनी आणखी जोमाने अर्ज भरण्याची तयारी सुरु केली आहे.
ऐन निवडणुकीत विरोधकाने केली " करणी" | The opposition did "Karni" in the election.
ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षा पेक्षा भाऊबंदकीवर जास्त अवलंबून असते. त्यामुळे मी नाही तर तु पण नाही . तुझ्या पेक्षा विरोधक परवडला म्हणून आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी आता पासून खेचा खेचीला सुरुवात झाली आहे. हे करत असताना करणीचे प्रकार वाढू लागले असल्याने या निवडणुकीच्या माध्यमातून अंधश्रद्धा आणि बुवाबाजीला उधान आले आहे.
ऐन निवडणुकीत विरोधकाने केली " करणी" | The opposition did "Karni" in the election.
#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click
सरपंच आरक्षण पाहण्यासाठी याच हेडिंगवर क्लिक करा
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या सरपंच व सदस्यपदाच्या अर्जाची माहिती.
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments