स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे एक रक्कमी एफ.आर.पी.:राजू शेट्टी|One amount F.R.P. due to Swabhimani movement: Raju Shetty
स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे एक रक्कमी एफ.आर.पी.:राजू शेट्टी|One amount F.R.P. due to Swabhimani movement: Raju Shetty
स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे एक रक्कमी एफ.आर.पी.:राजू शेट्टी|One amount F.R.P. due to Swabhimani movement: Raju Shetty
इस्लामपूर :राज्य सरकारला एफआरपीत बदल करण्याचा अधिकार नसताना तत्कालीन सरकारने बदल केला. केंद्र सरकारच्या परवानगी शिवाय हा बदल करता येत नाही.राज्य सरकारने एफआरपीचे दोन तुकडे केले. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना एकरक्कमी एफआरपी मिळाली. एफआरपीचे दोन तुकडयांचा डाव हाणून पाडला, याचा मला सार्थ अभिमान आहे .एफआरपीच्या सुत्रामध्ये नव्याने बदल होण्याची गरज आहे. यापुढे इथेनॉल मधील ७५ टक्के हिस्सा द्या, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खा.राजू शेट्टी यांनी दिला.
स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे एक रक्कमी एफ.आर.पी.:राजू शेट्टी|One amount F.R.P. due to Swabhimani movement: Raju Shetty
वाळवा तालुक्यातील तांबवे ता वाळवा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसाच्या एकरकमी एफआरपीसाठी केलेल्या आंदोलनास आलेल्या यशाबद्दल माजी खा. राजु
शेट्टी यांचा ताबवे गावाच्या वतीने आयोजित सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील, भागवत जाधव, पोपट मोरे, एस.यु.संदे यांची प्रमुख उपस्थिती होती.शेट्टी पुढे म्हणाले, आता आपण रस्त्यावरची लढाई जिंकलो आहे एफआरपीच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात अपील केले आहे. ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. कोल्हापूर जिल्हयातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली. मात्र सांगली जिल्हयातील कारखानदार तयार नव्हते. मात्र स्वाभिमानी च्या आंदोलनामुळे त्यांना गुडघे टेकायला लावले. महाराष्ट्रातील साखर कारखाने मोजक्या राजकीय नेत्यांच्या हातात आहेत. काही कारखाने पवार कुटुंबीयांकडे आहेत. दिवसाला त्यांचा ७ हजार टन ऊस गाळप केला जातो. असे आठ ते दहा लोक आहेत. एकूण हिशोब केला तर दीड लाख टन ऊस हेच लोक गाळप करतात .
स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे एक रक्कमी एफ.आर.पी.:राजू शेट्टी|One amount F.R.P. due to Swabhimani movement: Raju Shetty
शेट्टी म्हणाले, या साखर कारखान्याची पहिली उच्चल २२०० ते २३०० रुपये देण्याचे धोरण होते. याने शेतकऱ्यांची सोसायटी तरी फिटली असती का ? जिल्हामध्यवर्ती बँका कारखानदारांना १३ टक्के व्याजाने पैसे देतात. व बँकेतील संचालक पोसली जातात. उत्पादन खर्च वाढला आहे. दोन वेळा महापूर येवून गेला. पण शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कोण तयार नाही. यावेळी कोणालाही सोडणार नाही. सध्या साखर कारखानदार काटामारी करत आहेत. पुढच्या हंगामात ऑनलाईन काटयाने वजन होईल.३००० हजार मिळणारा ऊसाचा भाव हा समाधानकारक नाही.भरमसाठ वाढलेले खतांचे दर,औषधे, वीजबिल पाहाता मीही समाधानी नाही .साखर कारखान्याच्या कारखान्यातील संचालकांनाही किंमत दिली जात नाही. ते फक्त चहाचे कपाचे मानकरी असतात, अशी टिका शेट्टी यांनी केली.
स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे एक रक्कमी एफ.आर.पी.:राजू शेट्टी|One amount F.R.P. due to Swabhimani movement: Raju Shetty
जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, सांगली जिल्हयातील कारखानदार मुर्दाड आहेत.संगटनेच्या आंदोलनामुळे एकरकमी एफआरपी मिळाली. शेतकऱ्यांच्या ऊसाची काटामारी करून या नेत्यांचे राजकारण सुरु आहे. यापुढे ऊसाच्या वजनात फरक पडला तर ऊसाचे दांडके हातात घ्यावे लागणार आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरीसंघटना तयार आहे, असा इशारा खराडे यांनी दिला. हातकंणगले मतदार संघाचे खा.धैर्यशील माने यांनी कधी ऊस प्रश्नावर संसदेत आवाज उठवला का?शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलेत का अशी टीका खराडे यांनी केली. स्वागत व प्रास्ताविक युवा आघाडीचे रविकिरण माने यांनी केले. संयोजन संतोष शेळके,जगन्नाथ भोसले, रामराव जाधव, भगवान सुतार, भास्कर मोरे, शंकरआण्णा पाटील, दत्ताजी पाटील, शिवाजी पाटील, बबन पाटील, अतुल जाधव, नितीन पाटील यांनी केले.
स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे एक रक्कमी एफ.आर.पी.:राजू शेट्टी|One amount F.R.P. due to Swabhimani movement: Raju Shetty
शेअर्स मार्केट घोटाळा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावा.वाळवा तालुक्यात शेअर्स मार्केटचे पेव फुटले आहे. तालुक्यात अडीशे ते तीनशे कोटी रुपये शेअर्स मार्केटमध्ये बुडाले आहेत. वर्षाला ४८ टक्के परतावा जगात कुठली बँक देते का? ही शेतकऱ्यांच्या पोरांची फसवणूक आहे.स्थानिक प्रतिनिधींचे याकडे लक्ष नाही.काही शेअर गुतवणूकदारानी स्वतः च्या जमीनी विकल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना तुमच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांच्या पोरांचे पैसे बुडवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा,असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे एक रक्कमी एफ.आर.पी.:राजू शेट्टी|One amount F.R.P. due to Swabhimani movement: Raju Shetty
फक्त सरपंच पदासाठी निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायत |
---|
माहितीसाठी खालील हेडिंगवर क्लिक करा |
गिरजवडे |
माळेवाडी |
पुनवत |
सर्व ग्रामपंचायत |
----------------
#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
0 Comments