अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना |Officials and staff left for the polling station
अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना |Officials and staff left for the polling station
शिराळा,ता.१७:शिराळा तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी १३०२ मतदान कर्मचारी गावोगावी १९५ मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत . आज सकाळी सात पासून तहसील कार्यालयात मतदानासाठी लागणारे साहित्य नेण्यासाठी केंद्राध्यक्ष व कर्मचारी उपस्थित होते होते. या वर्षी तहसील कार्यालयात सर्व साहित्य एकत्र करून देण्याची सोय करण्यात आली होती. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे यांनी अधिकारी व कर्मचारी यांना सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या.
अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना |Officials and staff left for the polling station
दरवर्षी आय टी आय मध्ये साहित्य देण्याची व्यवस्था असते . मात्र या वर्षी बदल करून तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत सर्व साहित्य एकत्र करून देण्यात आले आहे. तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून मतदानासाठी १३०२ कर्मचारी आज मतदान केंद्रावर २५एस. टी. बस. व ७जिप मधून आप आपल्या मतदान केंद्रावर पोहचले आहेत. ५६ ग्रामपंचायतीसाठी १९५मतदान केंद्रे असून यासाठी १४ झोनल अधिकारी, तर २७ निवडणुक निर्णय अधिकारी, २१७ केंद्राध्यक्ष, तर १३०२ मतदान अधिकारी व कर्मचारी आहेत. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते ५.३० आहे तालुक्यातील कांदे, सागाव, कणदूर, पाडळी, मांगले, आरळा, कोकरुड , शेडगेवाडी, चिंचोली, मणदूर, मांगरुळ, येळापूर, चरण ही १३ गावे संवेदनशील आहेत. त्याठिकाणी विषेश पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिराळा शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आयटीआय बायपास ते करमाळा रोड पर्यंत हा प्रमुख मार्गावरील वाहतूक सकाळ पासून दुपार पर्यंत बंद होती.
अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना |Officials and staff left for the polling station
उद्या रविवारी रविवारी (ता. १८)रोजी सायंकाळी पाच पासून रात्री उशिरा पर्यंत बंद राहणार आहे . यावेळी हि वाहतूक कापरी नाका ते बायपास कापरी फाटा अशी सुरू राहणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून १ उपविभागीय पोलिस अधिकारी , १ पोलिस निरीक्षक, ९ पोलिस उपनिरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक , १९७ पोलिस कर्मचारी, ९१ होमगार्ड, १ एसआरपी एफ सेक्शन असा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून सह ८ वाहने ठेवण्यात आली आहे. भरारी पोलिस पथके ही ठेवण्यात आली आहेत.
अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना |Officials and staff left for the polling station
फक्त सरपंच पदासाठी निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायत |
---|
माहितीसाठी खालील हेडिंगवर क्लिक करा |
गिरजवडे |
माळेवाडी |
पुनवत |
सर्व ग्रामपंचायत |
----------------
#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
0 Comments