कासेगावचे जनार्दनकाका यांचे निधन | Janardankaka of Kasegaon passed away
कासेगावचे जनार्दनकाका यांचे निधन | Janardankaka of Kasegaon passed away
कासेगावचे जनार्दनकाका यांचे निधन | Janardankaka of Kasegaon passed away
इस्लामपूर: कासेगाव (ता. वाळवा) येथील वाळवा पंचायत समितीचे माजी सभापती, राजाराम बापू सहकारी बँकेचे उपाध्यक्ष जनार्दन यशवंत पाटील यांचे आज सोमवारी दुपारी बेळगाव येथे निधन झाले. खाजगी हॉस्पिटलमध्ये गेल्या आठ दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८३ वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी ९ वाजता कासेगाव (ता.वाळवा) येथील त्यांच्या गावातील वाड्यासमोर अंत्यदर्शना साठी ठेवण्यात येणार असून कृष्णा नदी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
कासेगावचे जनार्दनकाका यांचे निधन | Janardankaka of Kasegaon passed away
ते लोकनेते राजारामबापू पाटील यांचे पुतणे, माजी मंत्री,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांचे चुलत भाऊ,तर सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, देवराज पाटील,जिल्हा परिषद सदस्या संगीता पाटील यांचे वडील होत. जनार्दनकाका पाटील यांनी तरुण वयातच सार्वजनिक जीवनास सुरुवात करून त्यांचे वडील माजी सरपंच,राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक स्व.यशवंतअण्णा पाटील यांचा राजकीय वारसा समर्थपणे पुढे नेला आहे. प्रथम ते स्व.बापूंच्याबरोबर संपूर्ण राज्यात सावली सारखे वावरले आहेत. त्यांनी कासेगावचे सरपंच,जिल्हा परिषदेचे सदस्य,राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि वाळवा पंचायत समितीचे सभापती पद भूषविले आहे. त्यांच्या साडे सात वर्षाच्या सभापती पदाच्या कारकिर्दीत वाळवा पंचायत समितीने सातत्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
कासेगावचे जनार्दनकाका यांचे निधन | Janardankaka of Kasegaon passed away
ते सध्या राजारामबापू सहकारी बँकेचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पहात होते. ते पाटील परिवाराचे कुटूंब प्रमुख होते. त्यांनी कासेगाव व कासेगाव परिसरातील गांवे व सर्व सामान्य माणसांशी एक कौटुंबिक नाते निर्माण केले होते. कासेगाव,परिसरातील गांवे व तालुक्या च्या विकासात मोलाचे योगदान केलेले आहे. ते एक मृदु स्वभावाचे कणखर नेते म्हणून संपूर्ण जिल्ह्याला परिचीत होते. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा,चार मुली,सून,नातू, चुलत भाऊ,पुतणे असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन बुधवार दि.२८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ९.३० कासेगाव (ता.वाळवा) येथे केले जाणार आहे.
कासेगावचे जनार्दनकाका यांचे निधन | Janardankaka of Kasegaon passed away
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments