बंडखोरी कशी रोखणार | How to prevent rebellion
बंडखोरी कशी रोखणार | How to prevent rebellion
शिराळा,ता.७ :शिराळा तालुक्यातील ६० ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे राजकीय रणांगण तापले असून आज अर्ज माघारीचा दिवस असल्याने अनेक ठिकाणी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली असली तरी बंडखोरांना थोपवण्याचे आवाहन नेत्यांच्या समोर आहे. अनेक गावात भाजप राष्ट्रवादीने बिनविरोध साठी समझोता केला असला तरी तिसरी आघाडी म्हणून निर्माण झालेल्या इतर घटक पक्षाच्या युवकांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिराळा तालुक्यात एक चुरस निर्माण झाली आहे. ही निवडणूक पक्षाची नव्हे तर गटागटाची होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आज दुपारी नेमके चित्र स्षष्ट होईल.
बंडखोरी कशी रोखणार | How to prevent rebellion
या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची थेट लढत असली तरी काही गावात कॉंग्रेस ,मनसे, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, प्रहार शेतकरी संघटना, , स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना,महाडिक युवा शक्ती यांनी ज्या प्रभागात आपले प्रभुत्व आहे अशा गावात उमेदवारी अर्ज भरले आहेत. काही गावात स्थानिक पर्यायी तिसरी आघाडी तयार झाली आहे.
बंडखोरी कशी रोखणार | How to prevent rebellion
त्यामुळे या बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्यात पक्षातील प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. सरपंचपद थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने इच्छुकांची संख्याही वाढली आहे. यामुळे गाव कारभाऱ्यांकडून प्रभावी उमेदवाराचा शोध घेतला असला तरी त्यात चुरस निर्माण झाली आहे.
बंडखोरी कशी रोखणार | How to prevent rebellion
काही गावात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समजता करून निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरवले असले तरी त्या ठिकाणी इतर पक्षाच्या युवकांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रस्थापितांच्या विरोधात होणार असे संकेत मिळत आहेत. ज्या ठिकाणी इतर घटक पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यांच्याशी चर्चा करून समन्वयातून ग्रामपंचायत बिनविरोध कशी होईल यासाठी स्थानिक नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र यासाठी आम्हाला संधी द्या अशी मागणी बंडखोर विरोधकांच्यातून होत असल्याने काही ठिकाणी अंतर्गत गळचेपी सुरू झाली आहे. काही गावात भाऊबंदकीचा वाद सुरू झाल्याने गटा अंतर्गत दुफळी होऊन विरोधकांशी हात मिळवणी करून आपला प्रभाग कसा शाबू ठेवता येईल यासाठी स्थानिक पातळीवर हालचाली गतिमान झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीसाठी नेत्यांचा कस पणाला लागणार आहे.
बंडखोरी कशी रोखणार | How to prevent rebellion
#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click
शिराळा तालुक्यातील ६० ग्रामपंचायतचा रणसंग्राम सुरु झाला असून प्रत्येक गावचे अपडेट त्या त्या ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या.
सरपंच आरक्षण पाहण्यासाठी याच हेडिंगवर क्लिक करा
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या सरपंच व सदस्यपदाच्या एकूण अर्जाची माहिती.
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments