राज ठाकरे यांच्या खटल्याबाबत १६ जानेवारीला सुनावणी | Hearing on Raj Thackeray's case on January 16
राज ठाकरे यांच्या खटल्याबाबत १६ जानेवारीला सुनावणी | Hearing on Raj Thackeray's case on January 16
शिराळा ,ता.६ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मनसे नेते शिरीष पारकर यांच्या विरोधात शिराळा न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याबाबत आज शिराळा न्यायालयात सुनावणी होती. परंतु त्यास राज ठाकरे अन्य कामामुळे हजर राहून शकत नसल्याचा अर्ज न्यायालयात देण्यात आल्याने तो न्यायालयाने मंजूर करून पुढील तारीख १६ जानेवारी २०२३ देण्यात आली आहे.
राज ठाकरे यांच्या खटल्याबाबत १६ जानेवारीला सुनावणी | Hearing on Raj Thackeray's case on January 16
याबाबत हकीगत अशी सन २००८ मध्ये भारतीय रेल्वे मध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून मनसे तर्फे महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले होते. याबद्दल रेल्वेच्या कल्याण न्यायालयात राज ठाकरे यांचे विरोधात गुन्हा दाखल झाला म्हणून त्यांना रत्नागिरी येथे अटक करून कल्याण न्यायालयात नेल्याने महाराष्ट्रभर मनसेने आंदोलन करून अनेक ठिकाणी बंद पुकारला होता.
राज ठाकरे यांच्या खटल्याबाबत १६ जानेवारीला सुनावणी | Hearing on Raj Thackeray's case on January 16
त्यावेळी शिराळा तालुका मनसेकडून जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी शेडगेवाडी येथे बंद पुकारून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले म्हणून त्यांच्या सह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये ९ नंबरचे आरोपी म्हणून राज ठाकरे व तत्कालीन मनसेचे नेते शिरीष पारकर यांना दहा नंबरचे सह आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे सदर गुन्हा घडतेवेळी राज ठाकरे व शिरीष पारकर उपस्थित नव्हते. ते अन्य गुन्ह्याच्याकामी अटकेत होते. त्यांच्याविरुध्द केस चालविण्याइतपत पुरावा नाही. त्यामुळे त्यांची सदर गुन्ह्यातून मुक्तता करण्यात यावी असा १५ ऑक्टोंबर रोजी अर्ज त्यांच्यावतीने शिराळा न्यायालयात केला होता. सदर अर्जावर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील संदीप पाटील यांनी हरकत घेतली होती.
राज ठाकरे यांच्या खटल्याबाबत १६ जानेवारीला सुनावणी | Hearing on Raj Thackeray's case on January 16
सदर गुन्हा हा त्यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणामुळे घडला आहे. सदर गुन्ह्यास त्यांनी परावृत्त केल्यामुळे आरोपींनी शेडगेवाडी फाटा येथे बंद पुकारला व परप्रांतीय लोकांच्या रेल्वेमध्ये होत असलेल्या भरतीचा विरोध केला. त्यामुळे व्यापा-यांना बंद पाळावा लागला. या गुन्ह्यात त्यांचा सकृतदर्शनी सहभाग असून त्याकरिता न्यायालयात खटला चालविणे गरजेचे आहे. त्यामुळे सदरचा अर्ज नामंजूर व्हावा. यावेळी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून व उपलब्ध पुराव्याचे आधारे त्यांचा अर्ज शिराळा न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रीती अ. श्रीराम यांनी १५ ऑक्टोंबर रोजी नामंजूर केला होता. सदर कामी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील संदीप पाटील यांनी बाजू मांडली होती. त्यांच्या वर दोषारोष ठेवण्याकरिता पुढील तारीख सहा डिसेंबर देण्यात आली होती.परंतु त्यास हजर राहून शकत नसल्याचा अर्ज आज ६ डिसेंबर रोजी न्यायालयात देण्यात आला. तो न्यायालयाने मंजूर करून पुढील तारीख १६ जानेवारी २०२३ देण्यात आली आहे.
राज ठाकरे यांच्या खटल्याबाबत १६ जानेवारीला सुनावणी | Hearing on Raj Thackeray's case on January 16
#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click
शिराळा तालुक्यातील ६० ग्रामपंचायतचा रणसंग्राम सुरु झाला असून प्रत्येक गावचे अपडेट त्या त्या ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या.
शिराळा,ता.२ :शिराळा तालुक्यातील ६० ग्रामपंचायतसाठी निवडणूक लागली असून आज शेवटच्या पाचव्या दिवशी सरपंचपदासाठी १९५ तर सदस्यपदासाठी १०३४ असे एकूण १२२९ अर्ज आले आहेत. आज अखेर सरपंचपदासाठी ३२२ तर सदस्यपदासाठी एकूण १५८१ असे एकूण १९०३ अर्ज दाखल झाले आहेत. ही प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती. कोणत्या गावात किती अर्ज पाहण्यासाठी खालील ग्रामपंचायत चार्टवर क्लिक करून गाव निहाय आकडे पहा
#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click
सरपंच आरक्षण पाहण्यासाठी याच हेडिंगवर क्लिक करा
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या सरपंच व सदस्यपदाच्या एकूण अर्जाची माहिती.
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments