मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज | Election system ready for voting
मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज | Election system ready for voting
मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज | Election system ready for voting
शिराळा, ता.१६: शिराळा तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.तालुक्यातील १३ गावे संवेदनशील असून त्या ठिकाणी विषेश पथके नियुक्त करण्यात आली आहेत .शनिवारी व रविवारी दोन दिवस आयटीआय ते करमाळा फाटा या शिराळा शहरातील मुख्य मार्गाच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली.
यावेळी तहसीलदार गणेश शिंदे म्हणाले, तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीसाठी १९५ मतदान केंद्रे असून यासाठी १४ झोनल अधिकारी, तर २७ निवडणुक निर्णय अधिकारी, २१७ केंद्राध्यक्ष, तर १३०२ मतदान अधिकारी व कर्मचारी आहेत. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते ५.३० आहे .
मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज | Election system ready for voting
तालुक्यातील कांदे, सागाव, कणदूर, पाडळी, मांगले, आरळा, कोकरुड , शेडगेवाडी, चिंचोली, मणदूर, मांगरुळ, येळापूर, चरण ही १३ गावे संवेदनशील आहेत. त्याठिकाणी विषेश पोलिस पथकाचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना नेआण करण्यासाठी २५ एसटी बस व ७ जीप गाड्या ठेवण्यात आल्या आहेत.
दोन दिवस शिराळा शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून उद्या शनिवार दिनांक १७ रोजी सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत आयटीआय बायपास ते करमाळा रोड पर्यंत हा प्रमुख मार्ग वाहतूक बंद राहणार असून रविवारी दिनांक १८रोजी सायंकाळी पाच वाजल्या पासून रात्री उशिरा पर्यंत बंद राहणार आहे. यावेळी ही वाहतूक कापरी नाका ते बायपास अशी सुरू राहणार आहे.
मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज | Election system ready for voting
यावेळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून यामध्ये १ उपविभागीय पोलीस अधिकारी , १ पोलिस निरीक्षक, ९ पोलिस उपनिरीक्षक, व सहायक पोलीस निरीक्षक,१९७ पोलिस कर्मचारी, ९१ होमगार्ड, १ एसआरपी एफ सेक्शन सह ८ वाहने तैनात करण्यात आली आहेत. भरारी पोलिस पथके ही ठेवण्यात आली आहेत.
मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज | Election system ready for voting
फक्त सरपंच पदासाठी निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायत |
---|
माहितीसाठी खालील हेडिंगवर क्लिक करा |
गिरजवडे |
माळेवाडी |
पुनवत |
सर्व ग्रामपंचायत |
----------------
#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
0 Comments