BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वासोटा किल्ला पर्यटन | Vasota Fort Tourism

#वासोटा किल्ला# पर्यटन | #Vasota Fort #Tourism# 

#वासोटा किल्ला# पर्यटन | #Vasota Fort #Tourism# 

#वासोटा किल्ला# पर्यटन | #Vasota Fort #Tourism# 

 महाराष्ट्रभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला ऐतिहासिक वासोटा किल्ल्याचा ट्रेक सुरु झाल्याने पर्यटकांचे पाय वासोट्याकडे वळू लागले आहेत. कासच्या हंगाम समाप्तीकडे जात असताना वासोटा किल्ला ट्रेक सुरु होत असल्याने पर्यटनाचा पुढचा टप्पा सुरू होत आहे. दरवर्षी पावसाळ्यामुळे एक जून ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान हा किल्ला पर्यटकांसाठी बंद असतो. 

#वासोटा किल्ला# पर्यटन | #Vasota Fort #Tourism# 

#वासोटा किल्ला# पर्यटन | #Vasota Fort #Tourism# 

  दुर्गम असलेला हा किल्ला व्याघ्रगड म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रभरातील ट्रेकर्सना भुरळ घालणारा या किल्ल्याची सफर अविस्मरणीय असते. भैरवनाथ बोट क्लब, केदारेश्वर बोट क्लब, मुनावळे, व ब्राविमश्वर बोट क्लब शेंबडी यांच्या माध्यमातून बोट सेवा उपलब्ध केली जाते. पायथ्याला पोहोचल्यानंतर वन विभागाची परवानगी व आवश्यक शुल्क भरून ट्रेकला सुरुवात होते. वासोट्याचे जंगल एवढे घनदाट  आहे की इथे सूर्यकिरण ही जमिनीवर पोहोचत नाहीत.  दीड तासाच्या चढाईनंतर किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचता येते. किल्ल्यावर शंकराचे एक प्राचीन मंदिर, हनुमान मंदिर, जुन्या वाड्याच्या पायाचे भक्कम अवशेष व बुरुज आढळतात. किल्ले वासोटा किल्ल्याच्या पूर्वेला जुना वासोटा किल्ला आहे. जुना वासोटा किल्ल्याच्या डोंगरावरील एकावर एक असलेले  कातळ खडकाचे तर रचून झालेला बाबूकडा पाहताना मनाचा अक्षरशा थरकाप उडतो. या ठिकाणी दिलेल्या आवाजाचा प्रतिध्वनी पुन्हा-पुन्हा उमटतो. अशा या ऐतिहासिक वासोट्याचा ट्रेक चालू झाल्याने स्थानिकांसह व्यवसायिकांमधे आनंदाचे वातावरण आहे. 

#वासोटा किल्ला# पर्यटन | #Vasota Fort #Tourism# 

#वासोटा किल्ला# पर्यटन | #Vasota Fort #Tourism# 

यावर्षी पासून शुल्कवाढ - वनविभागाने यावर्षी येथील प्रत्येक शुल्कात वाढ केली आहे. 

तपशील  पूर्वीचा दर  आताचा दर

१२  वर्षांवरील   ३० - १००       

१२  वर्षांच्या आतील.  १५ - ५० 

गाइड फी.       २०० - २५० 

बोट शुल्क.      १५० - १५० 

कॅमेरा शुल्क.     ५० - १०० 

#वासोटा किल्ला# पर्यटन | #Vasota Fort #Tourism# 

Post a Comment

0 Comments