BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

खुनी सापडला| The murderer was found

खुनी सापडला| The murderer was found 




खुनी सापडला| The murderer was found  


शिराळा ,ता.१२: बेलदारवाडी ( ता.शिराळा) येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून करून फरारी  झालेल्या  संशयित आरोपी प्रकाश आनंदा शेवाळे यास शिराळा पोलिसांनी  अटक केली  आहे. 

खुनी सापडला| The murderer was found  


 
खुनी सापडला| The murderer was found  

 ही घटना  गुरुवारी (ता.१०) रोजी  रात्री १० ते  शुक्रवारी (ता. ११ ) रोजी सकाळी ११ वाजण्या पूर्वी घडली होती. याबाबत  मयत स्वातीची आई  वत्सला हणमंत चव्हाण  (वय ४८ ) रा. सध्या मलकापूर कराड मुळगाव गुंजेवाडी जि. उस्मानाबाद  यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. या बाबत घटनास्थळ व पोलिसांनी दिलेली माहिती अशी  प्रकाश व स्वाती यांचा प्रेम विवाह झाला होता. प्रकाश हा मजूर म्हणून काम  करत असल्याने तो कराड मलकापूर येथे आपली पत्नी व दोन मुलासह रहात आहे. प्रकाशचे  वडील आनंदा शेवाळे हे आजारी असल्याने त्यांना  गुरुवारी ता.१०  रोजी   कोल्हापूर येथे सी,पी.आर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते.


खुनी सापडला| The murderer was found  

 त्या ठिकाणी त्यांना  पाहण्यासाठी प्रकाश व स्वाती गेले होते. तिथून ते आई सह वडिलांना घेवून घरी बेलदारवाडी येथे आले.  त्या नंतर रात्री झोपल्या नंतर प्रकाशने पत्नी स्वातीचा गळा आवळून खून केला . सकाळी मोबाईल घरी ठेवून  व चिट्टी लिहून पसार झाला. त्या चिट्ठीत मीच स्वातीचा खून केला असून यास सासर अथवा माहेरच्या कोणाला दोषी धरू नये . मी  आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते. त्यामुळे बेलदारवाडी व इतर ठिकाणी पोलीस त्याचा गेले पाच दिवस शोध घेत होते. आज प्रकाश हा मांगरूळ येथे  येणार असल्याची  माहिती कोकरूड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव  वाघ यांना मिळाली. त्या प्रमाणे शिराळा व कोकरूड पोलिसांनी सापळा रचून मांगरूळ येथून  त्यास ताब्यात घेतले. ही कारवाई  कोकरूड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव  वाघ, पोलीस उपनिरीक्षक  अविनाश वाडेकर ,सहायक पोलीस फौजदार गणेश झांजरे  ,हवलदार शिवाजी शेळके , भीमराव कुंभार यांनी त्यास ताब्यात घेतले..

खुनी सापडला| The murderer was found  






Post a Comment

0 Comments