BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

#शिराळा# नगरपंचायत व# चांदोली #पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील |$ Shirala Nagar Panchayat and #Chandoli are striving for# tourism development

शिराळा नगरपंचायत व चांदोली पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील | Shirala Nagar Panchayat and Chandoli are striving for tourism development 

शिराळा ,ता .१०:शिराळा नगरपंचायतमधील बाजारपेठेतील महत्वाचे रस्ते विकास, पाणी पुरवठा तसेच चांदोली परिसर पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक ते प्रय़त्न केले जातील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  सांगितले.

शिराळा नगरपंचायत व चांदोली पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील | Shirala Nagar Panchayat and Chandoli are striving for tourism development  

शिराळा नगरपंचायत व चांदोली पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील | Shirala Nagar Panchayat and Chandoli are striving for tourism development  

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण आणि नागरी प्रश्नांबाबत खासदार धैर्यशील माने यांनी सुचवले प्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.मंत्रालयात झालेल्या बैठकीस कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार धैर्यशील माने, राज्याचे मुख्य सचिव मनुकूमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे, सांगली जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्यासह विविध विभागांचे सचिव स्तरीय अधिकारी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार, इचलकरंजी महानगपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख आदी उपस्थित होते. मतदारसंघातील विविध नगरपालिकांचे मुख्याधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

शिराळा नगरपंचायत व चांदोली पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील | Shirala Nagar Panchayat and Chandoli are striving for tourism development  

शिराळा नगरपंचायत व चांदोली पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील | Shirala Nagar Panchayat and Chandoli are striving for tourism development  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हातकणंगले लोकसभा अंतर्गत येणाऱ्या नगरपालिकांमधील विकास कामांना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. विविध कामांसाठी, प्रकल्प आणि योजनांसाठी वेळेत प्रस्ताव सादर केले जावेत. प्रत्यक्ष कामांमध्येही दर्जावर लक्ष दिले जावे. या परिसरातील पर्यटन संबधी विषयी आराखडा तयार करण्यासाठी पर्यटन विभागाने तज्ज्ञांची मदत घ्यावी. शिवराज्य भवन या योजनेतील कामांसाठी बांधकाम विभागाच्या सहभागातून एक टाईप प्लॅन तयार करून घ्यावा. जेणेकरून सर्वत्र एकाच प्रकारच्या इमारती व सुविधा निर्माण करता येतील. नगरपालिका क्षेत्रातील बाजारपेठांधील मुख्य बाजारपेठांच्या रस्तांचा एक मॉडेल पद्धतीने विकास करता येईल. त्यासाठी सुशोभिकरणासह उत्कृष्ट नियोजन करण्यात यावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. 

शिराळा नगरपंचायत व चांदोली पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील | Shirala Nagar Panchayat and Chandoli are striving for tourism development  

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, सांगली व कोल्हापूर जिल्हयात पर्यटनाच्या मोठी संधी आहेत. विशेषतः गडकोट-किल्ल्यांच्या अनुषंगाने एक आराखडा तयार करता येईल. सांगली, सातारा आणि कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा मोठा आहे. अन्य राज्यांमध्ये अशा पद्धतीने पर्यटन प्रकल्प राबविले जातात. त्याच धर्तीवर या दोन्ही जिल्हयांच्या समावेशासह प्रकल्प राबविल्यास मोठ्या पर्यटन क्षेत्राचा विकास होईल. त्यातून रोजगार संधी निर्माण होतील.

शिराळा नगरपंचायत व चांदोली पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील | Shirala Nagar Panchayat and Chandoli are striving for tourism development  

खासदार धैर्यशील माने यांनी  शिराळा नगरपंचायतीसह इतर नगरपालिकांना प्रशासकीय इमारतींसाठी निधीची उपलब्धता, पर्यटन आराखडा तयार करणे, शिराळा, चांदोली, पन्हाळा, शाहूवाडी, आंबा टूरिस्टससह विविध नगरपालिकांसाठी मंजूर रस्ते, सांडपाणी निचरा प्रकल्पांसाठीचा निधी आणि आराखडे, नगरपालिकामध्ये बाजारपेठांतील रस्त्यांचा विकास, गटारे, समाजकल्याण विभागांच्या संविधान भवन, अण्णा भाऊ साठे स्मारक भवन तसेच शिवराज्य भवन, शिराळा येथील संभाजी महाराजांचा भुईकोट किल्ल्याचा विकास, चांदोली पर्यटन विकास निधी याबाबतची चर्चा केली.

शिराळा नगरपंचायत व चांदोली पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील | Shirala Nagar Panchayat and Chandoli are striving for tourism development  

मंत्रालयातील या बैठकीस जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, रवींद्र माने व झाकीर भालदार, विनायक गायकवाड, शाहू काटकर, प्रवीण गायकवाड, मयूर भोसले, हर्षवर्धन  माने उपस्थित होते.

शिराळा नगरपंचायत व चांदोली पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील | Shirala Nagar Panchayat and Chandoli are striving for tourism development  

Post a Comment

0 Comments