BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गुगवाडला लाखोंच्या उपस्थितीत "धम्मभूमी"चे लोकार्पण | Inauguration of "Dhammbhoomi" in the presence of Lakhs at Gugwad

जत : जगभरात बौद्ध धम्म वाढ आहे. सर्वसामान्य माणसाला सन्मानाने जगण्याचा व त्यांचे आयुष्य सुंदर करण्याचे खरे कार्य बौद्ध धम्माच्या माध्यमातून होत आहे. यासाठी अनेक ठिकाणी विपश्यना केंद्र व मोठे विहार उभे होत आहेत. याच पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रात गुगवाड या ठिकाणी उभारण्यात आलेली ही ऐतिहासिक धम्मभूमी येणाऱ्या काळात अखंड मानव जातीसाठी शांततेचे प्रतिक ठरेल, असे प्रतिपादन पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी केले. 

गुगवाडला  लाखोंच्या उपस्थितीत "धम्मभूमी"चे लोकार्पण | Inauguration of "Dhammbhoomi" in the presence of Lakhs at Gugwad

गुगवाडला  लाखोंच्या उपस्थितीत "धम्मभूमी"चे लोकार्पण | Inauguration of "Dhammbhoomi" in the presence of Lakhs at Gugwad

    जत तालुक्यातील गुगवाड या ठिकाणी अथर्व चंद्रकांत सांगलीकर सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी धम्मभूमी उभारण्यात आली आहे. या धम्मभूमीचे भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, हजारो बौद्ध भिख्कूंच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सुरूवातीला पंचशील ध्वजारोहण, त्यानंतर बुद्ध मूर्तीची पूजा व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

गुगवाडला  लाखोंच्या उपस्थितीत "धम्मभूमी"चे लोकार्पण | Inauguration of "Dhammbhoomi" in the presence of Lakhs at Gugwad

  या ठिकाणी थायलंड वरून बारा फूट उंचीची पंचधातूच्या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. भदंत बोधी पालो महाथेरो आणि भिख्कू संघ यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी हजारो अनुयायांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. महाराष्ट्र व कर्नाटक सह देशभरातील महाथेरो, भिख्कू संघ, बौद्ध बांधव मोठ्या संख्येने दाखल झाला होता. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, इतिहास संशोधक प्रा.गौतम काटकर, प्रदिप कांबळे, मुख्याध्यापक बी.के.काटकर, उत्तम कांबळे, सागर माळी, श्रीमंत कांबळे, सुरेश कांबळे, किरण पाटील, महेश शिवशरण, सचिन इनामदार, संजीव साबळे, पवन वाघमारे, दयानंद कांबळे, रवी कांबळे, आदीसह समाज बांधवांनी चोख कामगिरी पार पाडली.

गुगवाडला  लाखोंच्या उपस्थितीत "धम्मभूमी"चे लोकार्पण | Inauguration of "Dhammbhoomi" in the presence of Lakhs at Gugwad

  अथर्व चंद्रकांत सांगलीकर सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा उद्योजक सी.आर.सांगलीकर म्हणाले, कालकथीत मुलगा अथर्व याच्या स्मरणार्थ समाजासाठी काम करण्याची इच्छा होती. यासाठी छोट्या स्वरूपात धम्मभूमीच्या उभारणीला वेग आला त्याला मोठे स्वरूप प्राप्त झाले. आज ते देशभरातील बौद्ध बांधवासाठी कायमस्वरूपी खूले ठेवण्यात येणार आहे. 

गुगवाडला  लाखोंच्या उपस्थितीत "धम्मभूमी"चे लोकार्पण | Inauguration of "Dhammbhoomi" in the presence of Lakhs at Gugwad

   इथेच न थांबता याठिकाणी भव्य विपश्यना केंद्र, संशोधन केंद्र, अद्यावत वाचनालय, युपीएससी व एमपीएससी ट्रेनिंग सेंटर, आदीसह लोकोपयोगी कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.

गुगवाडला  लाखोंच्या उपस्थितीत "धम्मभूमी"चे लोकार्पण | Inauguration of "Dhammbhoomi" in the presence of Lakhs at Gugwad

Post a Comment

0 Comments