कोणत्या गावात किती उमेदवार, कोणत्या ग्रामपंचायत बिनविरोध ,कोणत्या गावात सरपंच व सदस्य बिनबिरोध झाले. कोणत्या गावात प्रभाग निहाय किती मतदान झाले. कोणत्या उमेदवाराला किती मते पडली. कोण विजयी पाहण्यासाठी खालील तक्त्या मधील ग्रामपंचायत वर क्लिक करून जाणून घ्या
---------------------------------------------------------------------------------------------
२९) #ग्रामपंचायत गिरजवडे # शिराळा तालुका ##Gram Panchaya girjawade #Shirala Taluka #
गिरजवडे गावच्या सुज्ञ मतदारांनी आपल्या मनातला सरपंच म्हणून मला निवडून देवून विकासाला साथ दिली आहे. ही उमेदवारी माझी नसून तुम्हा सर्वांची आहे हे समजून जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा लढा देत तुम्ही मनापासून काम केले. त्यामुळे तुमच्या आशीर्वादावर व जोतीबा देवाच्या कृपेने मला गिरजवडे गावचा लोकनियुक्त सरपंच होण्याचा मन मिळाला .त्या बद्दल मी सर्वांचे आभार मानणार नाही तर तुमच्या ऋणात राहून सदैव आपल्या गावच्या व सर्वसामन्य लोकांच्या विकासासाठी सरपंच म्हणून नव्हे तर आपला लोकसेवक म्हणून झटत राहील.
मी मतदारांच्या घरी मला कामाची संधी द्या म्हणून जात असताना भरभरून पाठबळ मिळत होते.वडीलधाऱ्या लोकांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. मला बोलायचे बाळा आमचा आशीर्वाद तुलाच आहे. कितीही तुला विरोध करूदे तूच निवडून येणार असा मला आत्मविश्वास देत होते. या ज्योतिर्लिंगाच्या पावनभूमीमध्ये गिरजवडे ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक करण्याची परंपरा राखण्यासाठी ज्योतिर्लिंगाच्या पायथ्याशी दोन बैठका झाल्या. मात्र तो शब्द पाळला नाही .त्यामुळे सदस्य बिनविरोध झाले तरी सरपंच पदाची निवडणूक लागली .गावावर लादलेली ही निवडणूक गावातील जनतेला रुचली नाही .निवडणुकीने गावचे होणारे नुकसान व बिनविरोध झाली असती तर येणारा विकास निधी थांबला. याचं प्रत्युत्तर म्हणून जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतली आणि सर्वसामान्य कुटुंबातील माझ्यासारखे एका सामान्य कार्यकर्त्याला जनतेची सेवा करणाऱ्या कार्यकर्त्याला सरपंच पदी होण्याची संधी दिली . आज खऱ्या अर्थाने बळीराजाचं राज्य आलं असं मी म्हणेन. श्री ज्योतिर्लिंगाने मला निवडून देऊन लोकांनी दिलेला शब्द खरा ठरला. माझ्यावर विश्वास दाखवलेल्या सर्व सुज्ञ मतदार बंधू-भगिनींनी जेष्ठ नागरिकांनी व माझ्या सहकाऱ्यांनी मला मतदान रुपी आशीर्वाद देऊन मला प्रचंड मताने विजयी केलं. त्या सर्वांच्या ऋणात राहील. मला गिरजवडे, मुळीकवाडी मोंडेवाडी येथील जनतेची सेवा करण्याची संधी दिली. त्याच बरोबर गिरजवडे जनशक्ती ग्रामविकास पॅनेलला आमदार मानसिंगराव नाईक, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, रणधीर नाईक, सम्राटसिंह नाईक, विराज नाईक यांनी गावच्या विकासासाठी साथ दिली. भविष्यात गिरजवडे गावच्या विकासासाठी कोणताही राजकीय मतभेद न ठेवता गावचा सेवक म्हणून प्रामाणिक काम करेन .त्यासाठी गावातील सर्व लोकांचे मला सहकार्य राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.
आपला लोकसेवक - सचिन देसाई
एकूण मतदान , झालेले मतदान व टक्केवारी
प्रभाग १ - ३२२ - २५४ (७८.८८ )
प्रभाग २ - ३८६ -३०९ (८०.०५ )
प्रभाग ३- ४१३ - ३५८ (८६.६८)
---------------------------------------------
शिराळा तालुक्यातील ९१ ग्रामपंचायत पैकी पहिल्या टप्यात ६० ग्रामपंचायत च्या निवडणुका डिसेंबर २०२२ ला झाल्या असून दुसऱ्या टप्यात २९ ग्रामपंचायत च्या निवडणुका नोव्हेंबर २०२३ मध्ये होत आहेत. निवडणूक झालेल्या ग्रामपंचायत व होणाऱ्या ग्रामपंचायत ची माहिती गाव निहाय वाचा त्या त्या ग्रामपंचायत च्या नावावर क्लिक करून
मी सरपंच म्हणून नव्हे सेवक म्हणून उभा
गिरजवडे गावच्या विकासासाठी आणि गोर गरीब सर्वसामान्य जनतेच्या प्रगतीसाठी मी सरपंच म्हणून नव्हे तर आपल्या गावचा आपला सेवक म्हणून या निवडणुकीत उभा आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी हे सर्वांना वाटत होते. पण झाली नसली तरी तुम्ही सुज्ञ आहात .त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली नसली तरी तुमच्या मनातला सरपंच तुम्हीच निवडून विकासाला साथ देणार आहात. ही निवडणूक तुम्हीच सुज्ञ मतदारांनी हाती घेवून मला उमेदवारी दिली आहे. ही उमेदवारी माझी नसून तुम्हा सर्वांची आहे हे समजून मी काम करणार आहे. त्यामुळे तुमच्या आशीर्वादावर माझी पुढील वाटचाल राहील असे मनोगत गिरजवडे गावचे लोकनियुक्त सरपंच पदाचे उमेदवार सचिन देसाई यांनी शिव न्यूजशी बोलताना व्यक्त केले.
खर तर सचिन यांच्याकडे संयमी.शांत, विश्वासू , सुशिक्षित नेतृत्व म्हणून गिरजवडे,मुळीकवाडी, मोंडेवाडी सर्वचजण पहात आहेत. समाजकारण ८० टक्के तर राजकारण २० टक्के हे सूत्र बाळगून गावचा विकास हाच ध्यास डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आहोरात्र कष्ट सुरू केले आहे. गिरजवडे गावचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे. येथील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत तसेच गावामध्ये विकासकामे सुरू झाली पाहिजे. यासाठी शासन दरबारी तहसिल कार्यायल, पंचायत,जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सतत पाठपुरावा करून गावांमध्ये अनेक योजना आणण्यासाठी त्यांची सतत धडपड असते. त्याचा परिपाक म्हणून त्यांना ही उमेदवारी मिळाली आहे.
त्यांच्या नेतृत्वाची चुणूक गावकऱ्यानी एम. आय.टँक बांधकाम प्रसंगी अनुभवली आहे. गरजवडे गावासह परिसराला वरदायी ठरणारा आपला एम. आय.टँक हा प्रकल्प हा प्रकल्प ज्यावेळी सुरू करण्यात आला. त्यावेळी शेतकऱ्यांनी पिक असताना या तलावाचे काम सुरू करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य केले. परंतु काही कारणांमुळे एम. आय. टँक प्रकल्पाचे काम रखडले. त्या रखडलेल्या तलावाचे काम पुन्हा युध्द पातळीवर सुरू व्हावे यासाठी सचिन व अनेक ग्रामस्थांनी प्रशासकीय, शासकीय बाबींची पूर्तता साठी प्रयत्न सुरू केले. यावेळी आमदार मंत्री याच्यापर्यंत पाठपुरावा करण्यासाठी सचिन देसाई यांच्यासह ग्रामस्थांचे योगदान मोलाचे लाभले. अथक प्रयत्नानंतर पुन्हा रखडलेल्या तलावाचे काम पुन्हा जोमाने सुरू झाले. यासाठी शिराळा तालुक्यातील अनेक नेत्यांनी प्रयत्न केले हे नाकारता येणार नाही.तलावाचे काम सुरू असतानाच ज्या शेतकयांच्या जमिनी या तलावामध्ये गेल्या आहेत. त्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती, त्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी मोठे आदोलन उभे केले. यामध्ये सचिन यांचे योगदान मोलाचे होते. शेतजमिनींची नुकसान भरपाई मिळावी यासाठी पुन्हा सचिन यांनी शेतकऱ्यांच्या साथीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा आंदोलने उभारली .
तहसिलदार, बांधकाम विभागाचेअधिकारी आदींच्या गाठीभेटी घेण्याची धडपड सुरू झाली. सांगतील त्या त्या कागदपत्रांची पुर्तता शेतकऱ्यांकडून करण्याचा प्रयत्न सचिन देसाई त्यांचे सहकारी करू लागले. वेळोवेळी जमिनीच्या किमतीबाबत चर्चा घडवून प्रशासन व शेतकरी यांच्यात समन्वय साधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. अखेर सचिन यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या जमिनीला चांगला भाव मिळाला.गिरजवडे, मुळीकवाडी व मोंडेवाडी, मुंबई स्थित व बाहेरगावी रोजीरोटीसाठी नोकरीनिमित्त रहाणार्याना काही अडचण आल्यास सचिन भावाप्रमाणे अनेकांच्या मदतीला धावून जातात. त्यामुळे सर्वांनाच ते आपल्या घरातीलच आपला सदस्य आहे, असे प्रत्येकाला वाटते. नेहमीच गावांमध्ये स्थाईक असलेल्या सचिन यांचे ३६५ दिवस २४ तास अखंड सामाजीक कार्य सुरू असते. प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जावून सर्वांना आधार देण्याचे काम सचिन देसाई करत आहेत.
गेल्या अडीच वर्षापूर्वी कोरोना या महारोगाने जगभर हाहाकार माजवला होता. यावेळी प्रत्येकजण आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत होते. खरी माणूसकी काय असते यावेळी प्रत्येकाला समजले. आपला गाव, आपल्या गावांतील माणसं, मित्र, नातेवाईकांना या रोगाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी ते आपल्या सहकाऱ्या समवेत रस्त्यावर उतरले . ज्या ज्या वेळी गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले. त्यावेळी त्यांनी आपल्या सहकाऱ्या समवेत आपल्या जीवाची पर्वा न करता त्या रुग्णाच्या उपचारासाठी प्रयत्न करू लागले. कोरोनामुळे मुंबई तसेच परगावी कामानिमित्त गावाकडे यायला लागले व बाहेरगाव- हून आलेल्या नागरिकांना त्यांनी लागेल ती मदत केली. आधार दिला. अशी एक ना अनेक त्यांची सामाजीक कामे याठिकाणी आपणाला मांडता येतील. गावामध्ये जंगली श्वापदांनी अनेक पाळीव जनावरांवर हल्ले करून त्यांना आपले भक्ष केले. यावेळीही सचिन व त्यांच्या सहकार्यांनी वेळ वेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदने देवून अनेकांना नुकसान भरपाई मिळवून दिली.गावचा विकास झाला झाला पाहिजे, गावांमध्ये तटे हे आपापसात मिटले पाहिजेत, यासाठी त्यांचे सतत प्रयत्न सुरु आहेत. गाव तंटामुक्त झाले पाहिजे. गावात सामाजीक सलोखा राहिला पाहिजे, गावांतील रस्ते, स्ट्रीटलाईट, मंदिर परिसराचे सुशोभिकरण, दलित सुधारणासाठी प्रयत्न, बेघरांना घर मिळाले पाहिजे, गावांतील प्रत्येकाला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे, शेतीसाठी पाणी पुरवठा स्किम उभारली पाहिजे, गावातील शाळा अद्ययावत झाली पाहिजे, महिलांच्या बचत गटांना प्रोहत्सान दिले पाहिजे ,मुलांच्यासाठी आभ्यासिका पाहिजे, वाचनालय, व्यायामशाळा पाहिजे आदी अनेक विकासात्मक कामासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
गावच्या विकासासाठीचे ध्येय धोरण डोळ्यासमोर ठेवून सचिन देसाई ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये गिरजवडे जनशक्ती ग्रामविकास पॅनेल स्थापन करून सरपंचपदासाठी उभे राहिले आहेत. या पॅनेलला आमदार मानसिंगराव नाईक, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, रणधीर नाईक, सम्राटसिंह नाईक, विराज नाईक यांनी गावच्या विकासासाठी साथ दिली आहे. ही साथ अशीच पाच वर्षे अखंडीत राहील यात शंका नाही.
गिरजवडे ता. शिराळा येथील ज्योतिर्लिंग मंदिर येथे माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली गिरजवडेच्या जनशक्ती विकास पॅनेलने निवडणूक प्रचारात आघाडी घेवून घर टू घर प्रचार यंत्रणा गतिमान केली आहे. सरपंच पदाचे उमेदवार सचिन देसाई व पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी आपली भूमिका मतदारांना पटवून देवून विकासाला साथ द्या म्हणून साद घालत आहेत. त्यांना लोकांचा वाढता पाठींबा मिळत आहे.
👉ग्रामपंचायत कार्यालय हे गावचा चेहरा आहे. ग्रामपंचायत स्थापनेपासून आजतोपर्यंत ग्रामपंचायतीला स्वमालकीचे कार्यालय नाही. ग्रामपंचायतीस सुसज्ज असे ग्रामसचिवालय उभारणार.
👉 ग्रामस्थांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायतीच्या मालकीचा आर. ओ. प्लांटउभारणार.
👉आपल्या गावचे ग्रामदैवत व लाखो भाविकांचे कुलदैवत श्री जोतीलिंग मंदिराच्या जीर्ण झालेल्या सभामंडपास व मंदिरास भरीव निधी उभारणेस कटीबध्द.
👉गायमुख येथील श्री महादेव मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी असलेल्या शासकीय अडचणी दूर करून विकासनिधी मंजूर करणेकामी कटीबध्द तसेच श्री यमाई देवीचे मंदिर बांधकाम करणेसाठी प्रयत्न.
👉श्री जोतिलिंग देव मंदिराचा क वर्गाचा दर्जामधून ब वर्गामध्ये समाविष्ट करून जास्तीत जास्त निधीउपलब्ध करून गावच्या मंदिराच्या विकासासाठी कटीबध्द.
👉विद्यार्थ्यासाठी २४ तास अभ्यासिका.
👉गावच्या समस्या सोडवण्यासाठी सरपंच आपल्या दारी उपक्रम,
👉आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चौकामध्ये उभारणेकामी कटीबध्द.
👉महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान उभारणेकामी कटीबध्द.
👉स्त्री जन्माचे स्वागत नवा उपक्रम
👉जि. प. शाळेचा दर्जा सुधारणेसाठी भर देणार.
👉विद्यार्थ्याच्या शैक्षणिक सुविधा व अडचणी सोडविण्यासाठी कटीबध्द
👉 गिरजवडे, मांडेवाडी, मुळीकवाडी येथील अंतर्गत रस्ते सुधारणे व सुशोभिकरण करणे, पेव्हींग ब्लॉक बसविणे, सांडपाणी जाणेसाठी गटारे बांधणार.
👉दलितवस्ती सुधारणा योजनेअंतर्गत भरीव निधी उपलब्ध करणार.
👉ऊस शेती झालेने शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्ता तयार करणेसाठी योग्य ती उपाययोजना.
👉गोरगरीब शेतकऱ्यांना व अल्प भूधारक शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा मंजूर करणेकामी प्रयत्नशील.
👉मुळीकवाडी, मांडेवाडी येथे स्मशानभूमी बांधणेसाठी कटीबध्द.
👉गिरजवडे ते मुळीकवाडी, घागरेवाडी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार.
👉महिला बचत गटांना प्रोत्साहन व उद्योग वाढीसाठी प्रयत्न.
👉आठवडी बाजार पूर्ण क्षमतेने भरविणार.
👉बेघरांना प्रधानमंत्री घरकुल योजना, यशवंत, रमाई घरकुल योजना मिळवणेसाठी प्रयत्नशील.
👉तरूण मुलांना व्यायामासाठी प्रशस्त अशी स्व मालकीची व्यायामशाळा उभारणार.
👉राजाराम बिळासकर (दादा) यांचे घर ते तानाजी बिळासकर (तात्या) यांच्या घरापर्यंत गटर व काँक्रीटीकरण.
👉शेळके पाझर तलावाचे नूतनीकरण करणार.
👉 मुळीकवाडी मधील सर्जेराव मुळीक (टेलर) ते विश्वास बाबूराव मुळीक यांच्या घरापर्यंत गटर बांधकाम करणार.
👉मोडेवाडीमधील सर्व रस्ते कांक्रीटीकरण करणार.
👉गावच्या संरक्षणाच्यादृष्टीने गावचे चारही रस्ते सि. सी. टी. व्ही. नी युक्त करणार.
👉प्रहाद शेळके (नाना) यांच्या घरापासून ते किसन शेळके (आप्पा) यांच्या घरापर्यंत स्ट्रिट लाईटची सोय करणार.
👉तानाजी रामचंद्र मुळीक ते दगडू विष्णू सावंत यांचे घरापर्यंत पक्का रस्ता करणार.
👉सर्व योजना मी माझ्या कार्यकाळात आपणासाठी प्रयत्न करणार आहे. मी माझ्या किडे, मुळीकवाडी,मोडेवाडीतील ग्रामस्थांना वचन देतो की, मी माझ्या वचननाम्यानुसार पायाभूमी सुविधा, शिक्षण, स्वच्छता व आरोग्य या त्रिसूत्रीने गिरजवडे गावचा विकास करणार.
सचिन शिवाजी देसाई, रा. गिरजवडे सरपंच पदाचे उमेदवार
शिराळा :श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग देवस्थानच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, गिरजवडे गावच्या सर्वांगीण विकासासाठी, सरपंच पदाची उमेदवारी सर्वसामान्य लोकांच्या आग्रहास्तव मिळाली आहे.या मिळालेल्या संधीचा उपयोग पर्यटन स्थळ म्हणून घोषित झालेले गिरजवडे गावच्या सर्वांगीण विकासासाठी करणार आहे. ही निवडणूक लोकांनीच हाती घेल्याने आपल्या विजयाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे प्रतिपादन सरपंच पदाचे उमेदवार सचिन देसाई यांनी केले.
गिरजवडे ता. शिराळा येथील ज्योतिर्लिंग मंदिर येथे माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली गिरजवडे जनशक्ती विकास पॅनेलच्या उमेदवाराच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी सचिन देसाई म्हणाले, गिरजडे गाव पर्यटन क्षेत्राकडे वाटचाल करत आहे. त्यासाठी आधुनिक विकास आराखड्याची गरज आहे. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे काम गतीने सुरू असल्याने हा गंभीर असणारा प्रश्नही लवकरच मार्गी लागेल. येणाऱ्या काळात या योजनेचे कामात अतिशय दर्जेदार करून गावाला पिण्याचे पाणी भरपूर उपलब्ध होईल. या प्रचार शुभारंभ प्रसंगी माजी सरपंच आनंद शेळके, शिवाजी मोंडे, लक्ष्मण दरगडे, विठ्ठल मुळीक अरविंद पाटील, शरद पाटील, हौसेराव मुळीक , दिलीप मोंडे , जगन्नाथ कवडे, प्रदीप देसाई, रघुनाथ मोंडे, सुभाष पाटील, सुरेश मुळीक, हणमंत मुळीक, रोहित मोरे, भाऊ दरगडे उपस्थित होते.
फक्त सरपंच पदासाठी निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायत |
---|
माहितीसाठी खालील हेडिंगवर क्लिक करा |
गिरजवडे |
माळेवाडी |
पुनवत |
सर्व ग्रामपंचायत |
ग्रामपंचायत गिरजवडे | ||||
---|---|---|---|---|
सरपंच उमेदवार | चिन्ह | पक्ष | पडलेली मते | विजयी |
सचिन देसाई | ५३५ | विजय | ||
धोंडीराम मुळीक | ३८० | |||
बिनविरोध सदस्य | ||||
मोहन खाशाबा मुळीक | ||||
स्वप्नाली कृष्णा नलवडे | ||||
संगिता सुखदेव मुळीक | ||||
आत्माराम खाशाबा शेळके | ||||
इंदुबाई नामदेव सावंत | ||||
अजय नामदेव पाटील | ||||
रिक्त |
गिरजवडे ग्रामपंचायत आलेले अर्ज | ||
---|---|---|
तारीख | सरपंच | सदस्य |
२८ नोव्हेंबर | ० | ० |
२९ नोव्हेंबर | ० | ० |
3० नोव्हेंबर | ० | ० |
१ डिसेंबर | २ | १ |
२ डिसेंबर | २ | ५ |
एकूण | ४ | ६ |
#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
0 Comments