BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शॉक लागून मुलीचा मृत्यू -Girl died of shock

शॉक लागून मुलीचा मृत्यू -Girl died of shock

शॉक लागून मुलीचा मृत्यू -Girl died of shock

शॉक लागून मुलीचा मृत्यू -Girl died of shock

शिराळा,ता.१६: कांदे (ता. शिराळा) येथे  दुर्वा राजेंद्र ऊर्फ बंडा कुरणे ( वय ५)  रा. शिराळा  (सध्या कांदे)   या बालिकेचा  विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडे सहा  वाजण्याच्या सुमारास घडली. 

 याबाबत मयत दुर्वाचे वडील राजेंद्र ऊर्फ बंडा बिष्णू कुरणे (वय ४५) रा.शिराळा यांनी शिराळा पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

शॉक लागून मुलीचा मृत्यू -Girl died of shock

शॉक लागून मुलीचा मृत्यू -Girl died of shock

याबाबत शिराळा पोलीस व घटनास्थळा वरून मिळालेली माहिती अशी, राजेंद्र ऊर्फ बंडा कुरणे हे आई वडील, पत्नी व दोन मुलांसह शिराळा येथील प्राध्यापक कॉलनीमध्ये राहण्यास असून त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. सर्वात  लहान असणारी दुर्वा हि लहानपणापासून  अस्वलवाडी  येथे आजी आजोबा प्रमिला खोत व  पांडुरंग खोत यांच्याकडे  राहण्यास होती. प्रमिला व पांडुरंग खोत हे रोजंदारी  म्हणून काम करतात.  कांदे येथील करणसिंग चव्हाण यांच्याकडे ते सोमवार (ता.१४) नोव्हेंबरपासून कामावर आले  होते. यावेळी त्यांच्यासोबत दुर्वा ही आली होती.  कांदे येथे खोत दाम्पत्य राहण्यास आल्याने सोबत आणलेले साहित्य लावण्यासाठी शिराळा येथून  दुर्वाची आई सोनाली  आईवडिलांच्या मदतीसाठी कांदे गेली होती.  दुसऱ्याच दिवशी मंगळवार (ता. १५) नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास  खोली जवळ खेळत असताना  पोल्ट्रीच्या शेडला असणाऱ्या  तारेच्या जाळीस हात लावला असता तिला  शाॅक लागला. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. तिला तात्काळ शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आणले. परंतु त्या पूर्वीच  ती मयत झाल्याचे डॉक्टरांनी  सांगितले.त्या नंतर डॉ.अनिरुद्ध काकडे यांनी  शवविच्छेदन केले. पुढील तपास पोलीस हवालदार दिपक खोमणे  करत आहेत.

शॉक लागून मुलीचा मृत्यू -Girl died of shock

शॉक लागून मुलीचा मृत्यू -Girl died of shock

 कामाचा दुसरा व दुर्वाचा  शेवटचा दिवस

नवीन ठिकाणी दुर्वा आजी आजोबा सोबत आली होती. काम धंदा मिळाल्याने खोत दाम्पत्य आनंदी होते. त्यांचा हा आनंद दोन दिवस टिकल नाही. खोत दाम्पत्याच्या कामाचा दुसरा दिवस असताना दुदैवाने दुर्वाचा शेवटचा दिवस ठरला.

शॉक लागून मुलीचा मृत्यू -Girl died of shock

आजी समोर नातीचा अंत 

दुर्वा खेळत असताना शेजारी आजी होती. तिला विजेचा धक्का बसताच आजी प्रमिला   पळत तिला सोडवण्यास गेली असता तिला ही काही प्रमाणात विजेचा धक्का बसला. मात्र त्या ठिकाणीच  आजी समोर नातीचा अंत झाला. या चिमुकलीच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या अचानकपणे घडलेल्या घटनेने खोत व कुरणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

शॉक लागून मुलीचा मृत्यू -Girl died of shock

Post a Comment

0 Comments