BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

साहेबांचा फोटो पंतप्रधान मोदी समवेत लावण्याचे पाप करू नका -आमदार मानसिंगराव नाईक | Don't commit the sin of posting Deshmukh Saheb's photo with Prime Minister Modi - mla Mansingrao Naik

शिराळा : विरोधकांनी किमान अखंड आयुष्यभर काँग्रेसचे विचार व साथ न सोडणाऱ्या दिवंगत ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुखसाहेबांचा फोटो  पंतप्रधान मोदी यांच्या सोबत लावण्याचे पाप करू नये, अशी खरमरीत टीका आमदार मानसिंगराव नाईक यांनी सत्यजीत देशमुख यांचे नाव न घेता केली. 

उपवळे (ता. शिराळा) येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमीपूजन समारंभात बोलत होते. माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक प्रमुख उपस्थित होते.

 साहेबांचा फोटो पंतप्रधान मोदी समवेत लावण्याचे पाप करू नका -आमदार मानसिंगराव नाईक | Don't commit the sin of posting Deshmukh Saheb's photo with Prime Minister Modi - mla Mansingrao Naik

 साहेबांचा फोटो पंतप्रधान मोदी समवेत लावण्याचे पाप करू नका -आमदार मानसिंगराव नाईक | Don't commit the sin of posting Deshmukh Saheb's photo with Prime Minister Modi - mla Mansingrao Naik

आमदार नाईक म्हणाले, विरोधक जलजीवन मिशन योजनांची भूमिपूजन करताना पंतप्रधानांचा फोटो लावण्याचा सल्ला आम्हाला देत आहेत. आहो आम्ही केंद्र व राज्य सरकार कडून येणाऱ्या योजना राबवत आहे. सरकार कोणाचे आहे याला महत्व नाही, ते जनतेचं असते. पंतप्रधान वा मुख्यमंत्री असोत जनतेच्या पैशातून विकास योजना निर्माण करत व राबवत असतात. आमच्यावर टीका करण्यापूर्वी आत्मचिंतन करा. आपण या मतदारसंघातील जनतेसाठी काय केले आहे. जी कांही कामे केलीत त्यात टक्केवारी किती घेतली, याचे उत्तर आगोदर द्या. मग आमच्यावर बोला. मी व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईकसाहेबांनी विकासात्मक बदल घडवलेत. मतदारसंघात चौफेर विकास साधला आहे. 

 साहेबांचा फोटो पंतप्रधान मोदी समवेत लावण्याचे पाप करू नका -आमदार मानसिंगराव नाईक | Don't commit the sin of posting Deshmukh Saheb's photo with Prime Minister Modi - mla Mansingrao Naik

 साहेबांचा फोटो पंतप्रधान मोदी समवेत लावण्याचे पाप करू नका -आमदार मानसिंगराव नाईक | Don't commit the sin of posting Deshmukh Saheb's photo with Prime Minister Modi - mla Mansingrao Naik

ते म्हणाले, आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षस्थानी माझी निवड झाल्यापासून अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात आहेत. वन टाइम सेटलमेंट करून कर्ज वसुली, कर्जाची पुनर्बांधणी, मोठ्या प्रमाणात ठेवी बँकेत आणल्या आहेत. सभासद हिताचे निर्णय घेत बँकेला मोठा फायदा करून देण्याचे काम अखंडपणे सुरू आहे.

प्रारंभी आमदार नाईक यांच्या हस्ते कुदळ मारून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ झाला. सरपंच सौ. सखुताई गायकवाड यांच्या हस्ते सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमदार नाईक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार नाईक व माजी जिल्हा परिषद सदस्य नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास विश्वासचे संचालक दिनकरराव पाटील, बिऊरचे सरपंच सुखदेव पाटील, उपसरपंच दादासो गुरव, डॉ. संपतराव पाटील, तडवळे सरपंच अमृत पाटील, मोहन पाटील, अशोक पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजश्री पाटील, सविता गुरव व मोहन, बाबासो, लालासो व रंगराव पाटील, बिऊरचे उपसरपंच राजेंद्र पाटील, सर्जेराव, सयाजी, दिलीप व शंकर कदम, श्रीकांत पवार, लालासो पाटील, माजी उपसरपंच राजू मुलाणी आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

 साहेबांचा फोटो पंतप्रधान मोदी समवेत लावण्याचे पाप करू नका -आमदार मानसिंगराव नाईक | Don't commit the sin of posting Deshmukh Saheb's photo with Prime Minister Modi - mla Mansingrao Naik

Post a Comment

0 Comments