BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चारित्र्याच्या संशयातून खून | Character murder

चारित्र्याच्या संशयातून खून | Character murder



चारित्र्याच्या संशयातून खून | Character murder


चारित्र्याच्या संशयातून खून | Character murder

शिराळा,ता.११  : बेलदारवाडी (ता. शिराळा) येथे चारित्र्याच्या संशयावरून प्रकाश आनंदा शेवाळे याने पत्नी स्वाती प्रकाश शेवाळे (वय २६ ) हिचा गळा आवळून खून  केल्याची घटना घडली.  संशयित पती प्रकाश हा फरार झाला आहे.

चारित्र्याच्या संशयातून खून | Character murder

ही घटना काल गुरुवारी रात्री १० ते आज शुक्रवारी सकाळी ११ वाजण्या पूर्वी घडली. याबाबत  मयत स्वातीची आई  वत्सला हणमंत चव्हाण  (वय ४८ ) रा. सध्या मलकापूर कराड मुळगाव गुंजेवाडी जि. उस्मानाबाद   यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. घटनास्थळावरून  व पोलिसांनी दिलेली माहिती  अशी  प्रकाश व स्वाती यांचा प्रेम विवाह झाला आहे. प्रकाश हा मजूर म्हणून काम  करत असल्याने तो कराड मलकापूर येथे आपली पत्नी व दोन मुलासह रहात आहे. प्रकाशचे  वडील आनंदा शेवाळे हे आजारी असल्याने त्यांना काल गुरुवारी  कोल्हापूर येथे सी,पी.आर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांना  पाहण्यासाठी प्रकाश व स्वाती गेले होते. तिथून ते आई सह वडिलांना घेवून घरी बेलदारवाडी येथे आले. सायंकाळी जेवण  झाल्यानंतर प्रकाशचे आई वडील  शेजारी असणाऱ्या चुलत्यांच्या घरी तर प्रकाश व स्वाती हे त्यांच्या घरी झोपले. 

चारित्र्याच्या संशयातून खून | Character murder

चारित्र्याच्या संशयातून खून | Character murder

सकाळी नेहमी प्रमाणे प्रकाशची आई रंजना ह्या जनावरांना चारा पाणी घालण्यासाठी गेल्या . साडे आठ वाजण्याच्या सुमारास घरी परत आल्या असता त्यांना प्रकाश घरी दिसला नाही. घरात जाऊन पाहिले असता स्वाती झोपलेली दिसली. तिला हाका मारल्या असता तिने प्रतिसाद दिला नसल्याने जवळ जाऊन पाहिले असता ती निपचिप पडलेली दिसली. त्या ठिकाणी चिट्टी आढळून आली.  याबाबत पोलीस पाटील यांनी योगेश मस्कर शिराळा पोलीस ठाण्यात माहिती दिली. 
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी भेट दिली.शिराळा पोलीस निरीक्षक सुरेश  चिल्लावार ,सहायक  पोलीस निरीक्षक अविनाश वाडेकर, पोलीस उपनिरीक्षक जयनाथ चव्हाण ,कालिदास गावडे ,गणेश झांजरे,दीपक हांडे, विनोद जाधव ,भाऊसाहेब कुंभार,सुभाष पाटील ,अमर जाधव,अमोल साठे यांनी घटनास्थळी भेट देवून संशयित प्रकाश याचा शोध घेतला.  मयत स्वातीची आई,भाऊ, बहिण व इतर नातेवाईक  आल्यानंतर  मृतदेह शवविच्छेदनासाठी  शिराळा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. डॉ,अनिरुद्ध काकडे यांनी शवविच्छेदन केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश  चिल्लावार करत आहेत.

चारित्र्याच्या संशयातून खून | Character murder


चारित्र्याच्या संशयातून खून | Character murder

  मीच खून केला 
प्रकाशने पत्नीचा खुन करून मीच खून केला असून सासर व माहेरच्या कोणाला दोषी धरू नये अशी लिहून ठेवलेली चिट्ठी पोलिसांना मिळून आली.  मोबाईल ही घरीच ठेवून तो निघून गेला.
गावातील काही लोकांनी सकाळी गावातून बाहेर जाताना प्रकाशला  पाहिले असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलीस पथकाने त्या दिशेने प्रकाशचा बेलदारवाडी परिसरात शोध घेतला. पण तो सापडला नाही. 

चारित्र्याच्या संशयातून खून | Character मर्डर



  त्याच्या भावाने ही केली होती आत्महत्या.
घरात ज्या ठिकाणी स्वातीचा खून झाला त्याच ठिकाणी प्रकाशचा लहान भाऊ विकास याने दोन वर्षा पूर्वी दिवाळीच्या दरम्यान  आत्महत्या केली होती. आता खुनाच्या  घटनेमुळे शेवाळे कुटुंब उध्वस्त झाले आहे. 
 थकलेल्या  आई वडीलांचे  व चिमुकल्यांंचे काय ?

चारित्र्याच्या संशयातून खून | Character murder

अथर्व  हा ५  तर  आराध्या ही ३  वर्षाची आहे. आईचा खून झाल्याने व वडील खुनात अडकल्याने  ही मुल पोरखी झाली आहेत. आई वडील  वयोवृद्ध असून त्यांच्या  एका मुलाने  आत्महत्या व दुसऱ्याने खून केल्याने त्यांना ही आपले आयुष्य  कसे जगायचे हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे थकलेले आई वडील व चिमुकल्या मुलांचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

चारित्र्याच्या संशयातून खून | Character murder


                                                    





 

Post a Comment

0 Comments