BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

#एक रकमी एफआरपीची घोषणा ##Announcement of lump sum FRP#

  #एक रकमी एफआरपीची घोषणा ##Announcement of lump sum FRP#

  #एक रकमी एफआरपीची घोषणा ##Announcement of lump sum FRP#

  #एक रकमी एफआरपीची घोषणा ##Announcement of lump sum FRP#

एक रकमी एफआरपी द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संघर्ष सुरू आहे संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत  शिराळा तालुक्यातील दालमिया  शुगर कोकरूड कारखान्याने एक रकमी 3000 रुपये देण्याची घोषणा कार्यकारी संचालक संतोष कुंभार यांनी केली.

  #एक रकमी एफआरपीची घोषणा ##Announcement of lump sum FRP#

  #एक रकमी एफआरपीची घोषणा ##Announcement of lump sum FRP#

 याबद्दल स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी त्याचा सत्कार करून अभिनंदन केले. संतोष  कुंभार म्हणाले, आम्ही शेतकरी हितासाठी काम करत आहे. ऊस उत्पादकांना चांगला दर देण्याची आमची परंपरा आहे. गत वर्षी एफआरपी पेक्षा 50 रुपये ज्यादा शेतकऱ्यांना दिले आहेत. यंदा आम्ही  संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देवून एक रकमी एफआरपी देण्याची तयारी केली आहे. मात्र हंगाम संपल्या नंतर आणखी काही देता येते का याचाही सकारात्मक विचार करू. 

  #एक रकमी एफआरपीची घोषणा ##Announcement of lump sum FRP#

  #एक रकमी एफआरपीची घोषणा ##Announcement of lump sum FRP#

खराडे म्हणाले,  जिल्ह्यातील खासगी कारखाने एक रकमी एफआरपी देत आहेत .मात्र सहकारी साखर कारखाने मूग गिळून गप्प का आहेत . जिल्ह्यातील दुसऱ्या खासगी कारखान्याने एक रकमी एफआरपी जाहीर करून ऊस दराची कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला आहे . मात्र जिल्ह्यातील हुतात्मा ,राजारामबापू, क्रांती, विश्वास, सोनहिरा या कारखान्यांनी कोणतीही भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही  शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यात म्हणजे वारणा  नदी ओलांडली की सर्व २३  कारखान्यांनी खासगी आणि सहकारी सर्वांनी एक रकमी एफआरपी देण्याची घोषणा केली आहे. 

  #एक रकमी एफआरपीची घोषणा ##Announcement of lump sum FRP#

 सांगली जिल्ह्यात मात्र अळी मिळी  गुप चळी अशी भूमिका सहकारी साखर कारखान्यांनी घेतली आहे.  ती शेतकरी हिताची नाही.  त्यामुळे त्यांनाही वटणीवर आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.  यावेळी भागवत जाधव, प्रशासकीय अधिकारी महेश कवचाल, शिराळा अध्यक्ष राम पाटील, मानसिंग पाटील, देवेंद्र धस, शाहूवाडी अध्यक्ष सुरेश माहुटकर, शिवलिंग शेटे, चंद्रकांत पाटील, अशोक दिवे, प्रकाश पाटील, अरविंद पाटील, प्रभाकर पाटील, प्रकाश माळी, राजेंद्र पाटील, बाबुराव शिंदे , दिपक लाड, अजित साळोखे, रायसिंग पाटील ,भैय्या वडगावे , प्रशांत मिरजकर, राजू वडाम, गुरुनाथ शिंदे, संपत पाटील,  संदीप पाटील, भिमाशंकर पाटील, भीमराव नांगरे ,संदीप शिरोते,  जगन्नाथ भोसले, प्रताप पाटील  उपस्थित होते. 

  #एक रकमी एफआरपीची घोषणा ##Announcement of lump sum FRP#

Post a Comment

0 Comments