सुट्टी नाय झीरोच करणार | No holiday will do zero
सुट्टी नाय झीरोच करणार | No holiday will do zero
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम असणाऱ्या शिराळा तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत. या ६० गावांमध्ये थेट सरपंच निवडीसाठी उमेदवार कोण यासाठी गावोगावी गुप्त बैठका होऊन उमेदवारी चाचपणीतून गटांतर्गत सुरु झालेल्या कुरघोडीमुळे नाराजांनी आता सुट्टी नाय झीरोच करणार असा पवित्रा घेवून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरुवात केली आहे.
सुट्टी नाय झीरोच करणार | No holiday will do zero
या निवडणुकीत भाजपा व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची थेट लढत असली तरी काही गावात कॉंग्रेस ,मनसे, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी,प्रहार व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची स्वतंत्र मोट बांधण्याचे काम सुरु झाले आहे.त्यामुळे पक्षातील प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. सरपंचपद थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने इच्छुकांची संख्याही वाढली आहे. काही गावात सरपंचपदाचे आरक्षण असल्याने योग्य उमेदवार व त्यासाठी लागणारे विविध जातीचे दाखले जमा करण्यासाठी गावातील प्रमुख नेत्यांना धावपळ सुरु आहे.
सुट्टी नाय झीरोच करणार | No holiday will do zero
ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षा पेक्षा भाऊबंदकीवर जास्त अवलंबून असते. त्यामुळे मी नाही तर तु पण नाही . तुझ्या पेक्षा विरोधक परवडला म्हणून आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी आता पासून रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. सध्या थेट जनतेतून सरपंच निवड असल्याने या उमेदवारी चाचपणीतून काही गावात प्राथमिक टप्यात तूतू मै मै झाल्याने अनेकांनी विरोधकांशी संधान बांधण्यास सुरवात केली आहे. . त्यामुळे नेते मंडळींना या बंडोबांना थंड करणे ही डोकेदुखी ठरणार आहे.
सुट्टी नाय झीरोच करणार | No holiday will do zero
#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click
सरपंच आरक्षण पाहण्यासाठी याच हेडिंगवर क्लिक करा
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या सरपंच व सदस्यपदाच्या अर्जाची माहिती.
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments