स्व .माजी आमदार वसंतराव नाईक पुतळा अनावरण सोहळा | late Former MLA Vasantrao Naik statue unveiling ceremony

शिराळा,ता. ८: माजी आमदार स्व वसंतराव नाईक यांनी महात्मा फुलेंची परंपरा जोपासली. शिक्षणाची गंगा शिराळा तालुक्यात आणून पहील्या महाविद्यालयाची स्थापना केली. तालुक्यात शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासाचा पाया रोवला. त्यांच्या कार्याचा वसा नाईक कुटुंबीयांनी असाच पुढे चालवावा असे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
स्व .माजी आमदार वसंतराव नाईक पुतळा अनावरण सोहळा | late Former MLA Vasantrao Naik statue unveiling ceremony
स्व .माजी आमदार वसंतराव नाईक पुतळा अनावरण सोहळा | late Former MLA Vasantrao Naik statue unveiling ceremony
शिराळा येथे स्व .माजी आमदार वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक होते. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमनताई पाटील, सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, ॲड भगतसिंग नाईक , विश्वप्रतापसिंग नाईक, पृथ्वीसिंग नाईक, दिपक शिंदे, मानसिंगराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्व .माजी आमदार वसंतराव नाईक पुतळा अनावरण सोहळा | late Former MLA Vasantrao Naik statue unveiling ceremony
स्व .माजी आमदार वसंतराव नाईक पुतळा अनावरण सोहळा | late Former MLA Vasantrao Naik statue unveiling ceremony
खासदार धैर्यशील माने म्हणाले, स्व.वसंतराव नाईक यांनी संपत्ती नाही तर माणसं मिळवली .शिक्षण हे लढण्याचे साधन आहे हे ओळखून तालुक्यात शैक्षणिक सुविधा निर्माण करून खऱ्या अर्थाने या तालुक्यात शैक्षणिक चळवळ रुजवली.
स्व .माजी आमदार वसंतराव नाईक पुतळा अनावरण सोहळा | late Former MLA Vasantrao Naik statue unveiling ceremony
माजी मंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले, तालुक्याच्या विकासात स्व,वसंतराव नाईक यांचे मोठे योगदान आहे.
ॲड. भगतसिंग नाईक म्हणाले, स्व. वसंतराव नाईक बाबा कोणाला संत तर कोणाला वसंत दिसले,मात्र ज्यांनी संत आणि वसंत पहिला त्यांना खरे बाबा कळाले.
स्व .माजी आमदार वसंतराव नाईक पुतळा अनावरण सोहळा | late Former MLA Vasantrao Naik statue unveiling ceremony
स्व वसंतराव नाईक पुतळा अनावरण सोहळा | late Vasantrao Naik statue unveiling ceremony
यावेळी आयकर आयुक्त अभिनय कुंभार यांना नागभुमी भुषण पुरस्कार तर डॉ विजय कर्नाड यांना विषेश जिवन पुरस्कार देण्यात आला. तुमचे आमचे बाबा पुस्तकाच्या द्वितीय आवृत्ती व नागपंचमी ऐतिहासीक ग्रंथ याचे प्रकाशन करण्यात आले.
स्व वसंतराव नाईक पुतळा अनावरण सोहळा | late Vasantrao Naik statue unveiling ceremony
यावेळी नॅशनल पुरस्कार सहभागाबद्दल रेहान पठाण, आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्या बद्दल बी.आर. पाटील, सुनंदा मस्के यांचा सत्कार करण्यात आला. अभिनय कुंभार, डॉ विजय कर्नाड, भिमराव गायकवाड, सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक पृथ्विसिंग नाईक, तानाजी हवालदार , सुफिया नायकवडी यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत व प्रास्ताविक एस. एम. पाटील यांनी तर सूत्रसंचालन विनायक गायकवाड यांनी केले .
यावेळी सुशीलादेवी नाईक, सौ सुनितादेवी नाईक, सौ नलिनी नाईक, ॲड दुर्गा नाईक, लताताई पाटील, डॉ विजयमाला चव्हाण ,नम्रता नाईक, उदयसिंग नाईक, अमरसिंह नाईक, साम्राटसिंह नाईक, राजेंद्रसिंह नाईक, अभिजित पाटील आदी उपस्थित होते.आभार अशोक कुंभार यांनी मानले.

0 Comments