सद्गुरू प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा इस्लामपूर येथे महात्मा गांधी जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पल्लवी राकेश दरेकर तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रीती संतोष मोहिते उपस्थित होत्या. प्रारंभी दरेकर यांनी गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुषपहार अर्पण करून पूजन केले. शालेय विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी विषय मनोगत व्यक्त केले.
या स्पर्धेमध्ये अरोही शेवाळे ,मयुरी वाडकर,अनिरुद्ध भंडारे,सर्वेश शर्मा,तन्मय शिंदे ,चिराग मने,श्वेता शेवाले,श्रुती दरेकर,आदित्य मोहिते,विक्रांत झोरे,शहीशा पाटील यांना उत्कृष्ट वकृत्वसाठी बक्षीस देण्यात आले. मुख्यध्यापक पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी गांधीजींचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. ते स्वतःचे काम स्वतः करत . कोणावर विसंबून न राहता स्वकर्तृत्वावर आचार आणि विचार करून स्वावलंभी बनले होते. त्यांचे आचार व विचार आचरणात आणणे गरजेचे आहे. .स्वागत व प्रास्ताविक मुख्यध्यापक रामचंद्र पाटील यांनी केले. आभार प्रकाश मोरे यांनी मानले. या कार्यक्रमास स्वाती शेवाळे, शिल्पा शेवाळे ,नि वासी विद्यार्थी,शिक्षक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments