BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

येथे सुरु आहे दोनशे वर्षांची दीपोत्सवाची परंपरा | Wategaon's 200-year-old Deepotsava tradition

वाटेगाव (ता. वाळवा) : येथील श्री वासुदेव मंदिरामध्ये कोजागरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा असा महिनाभर साजरा होणाऱ्या दीपोत्सवास प्रारंभ झाला आहे. ग्रामस्थांनी ही दोनशे वर्षांची परंपरा  दिवेकर कुटुंबीयांनी आजही अखंडित सुरू ठेवली आहे.

 येथे सुरु आहे दोनशे वर्षांची  दीपोत्सवाची परंपरा | Wategaon's 200-year-old Deepotsava tradition

 येथे सुरु आहे दोनशे वर्षांची  दीपोत्सवाची परंपरा | Wategaon's 200-year-old Deepotsava tradition

येथील वासुदेव मंदिर संपूर्ण सागवानी लाकडाचा वापर करून उभारले आहे. दीपावलीची चाहूल लागते ती कोजागरी पौर्णिमेपासूनच दीपोत्सव सुरू होतो. ग्रामस्थांसाठी हा एक आनंददायी अनुभव असतो. तेला- तुपाच्या अगणित पितळी पणत्या, समया, टांगते कंदील, रंगमाळा ,दीपमाळा लावून हा दीपोत्सव साजरा केला जातो. दररोज पाच किलो गोडेतेल, एक हजार वाती यासाठी वापरल्या जातात. गाभाऱ्यात तुपाचे दिवे लावले जातात. जवळपास एक हजार दिव्यांनी मंदिर आणि परिसर उजळून निघतो.

 येथे सुरु आहे दोनशे वर्षांची  दीपोत्सवाची परंपरा | Wategaon's 200-year-old Deepotsava tradition

 येथे सुरु आहे दोनशे वर्षांची  दीपोत्सवाची परंपरा | Wategaon's 200-year-old Deepotsava tradition

 रोज रात्री भजनाचा कार्यक्रम व रात्री १०  वाजता दीपोत्सवास प्रारंभ होतो. २०० वर्षांहून ही अधिक काळ श्री विष्णू रुपी श्रीकृष्णाचे मंदिर दिमाखात उभे आहे. गावातील दिवेकर कुटुंबाचे हे देवस्थान असून मंदिराची लांबी ६० फूट असून रुंदी ३० फूट आहे. मंदिराचे शिखर ५० फूट असून अलीकडेच त्याचा जिर्णोद्धार केला आहे. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक मंदिरात गर्दी करत आहेत. महिनाभर चालणार दीपोत्सवास यशस्वी पार पाडण्यासाठी दिवेकर कुटुंबीय परिश्रम घेत आहेत.

 येथे सुरु आहे दोनशे वर्षांची  दीपोत्सवाची परंपरा | Wategaon's 200-year-old Deepotsava tradition

Post a Comment

0 Comments