शिराळा न्यायालयाने राज ठाकरे यांचा अर्ज केला नामंजूर |Shirala court rejected Raj Thackeray's application

शिराळा ,ता.१५ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मनसे नेते शिरीष पारकर यांची शिराळा न्यायालयात सुरु असलेल्या गुन्ह्यातून मुक्तता करावी हा अर्ज आज शिराळा न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रीती अ. श्रीराम यांनी नामंजूर केला आहे.
शिराळा न्यायालयाने राज ठाकरे यांचा अर्ज केला नामंजूर |Shirala court rejected Raj Thackeray's application
शिराळा न्यायालयाने राज ठाकरे यांचा अर्ज केला नामंजूर |Shirala court rejected Raj Thackeray's application
याबाबत हकीगत अशी सन २००८ मध्ये भारतीय रेल्वे मध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून मनसे तर्फे महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले होते. याबद्दल रेल्वेच्या कल्याण न्यायालयात राज ठाकरे यांचे विरोधात गुन्हा दाखल झाला म्हणून त्यांना रत्नागिरी येथे अटक करून कल्याण न्यायालयात नेल्याने महाराष्ट्रभर मनसेने आंदोलन करून अनेक ठिकाणी बंद पुकारला होता.
शिराळा न्यायालयाने राज ठाकरे यांचा अर्ज केला नामंजूर |Shirala court rejected Raj Thackeray's application
त्यावेळी शिराळा तालुका मनसेकडून जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी शेडगेवाडी येथे बंद पुकारून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले म्हणून त्यांच्या सह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये ९ नंबरचे आरोपी म्हणून राज ठाकरे व तत्कालीन मनसेचे नेते शिरीष पारकर यांना दहा नंबरचे सह आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे सदर गुन्हा घडतेवेळी राज ठाकरे व शिरीष पारकर उपस्थित नव्हते. ते अन्य गुन्ह्याच्याकामी अटकेत होते. त्यांच्याविरुध्द केस चालविण्याइतपत पुरावा नाही. त्यामुळे त्यांची सदर गुन्ह्यातून मुक्तता करण्यात यावी असा अर्ज त्यांच्यावतीने शिराळा न्यायालयात केला होता. सदर अर्जावरआज सरकार पक्षातर्फे सरकारी वकील संदीप पाटील यांनी हरकत घेतली.
शिराळा न्यायालयाने राज ठाकरे यांचा अर्ज केला नामंजूर |Shirala court rejected Raj Thackeray's application
सदर गुन्हा हा त्यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणामुळे घडला आहे. सदर गुन्ह्यास त्यांनी परावृत्त केल्यामुळे आरोपींनी शेडगेवाडी फाटा येथे बंद पुकारला व परप्रांतीय लोकांच्या रेल्वेमध्ये होत असलेल्या भरतीचा विरोध केला. त्यामुळे व्यापा-यांना बंद पाळावा लागला. या गुन्ह्यात त्यांचा सकृतदर्शनी सहभाग असून त्याकरिता न्यायालयात खटला चालविणे गरजेचे आहे. त्यामुळे सदरचा अर्ज नामंजूर व्हावा. यावेळी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून व उपलब्ध पुराव्याचे आधारे त्यांचा अर्ज शिराळा न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रीती अ. श्रीराम यांनी नामंजूर केला. सदर कामी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील संदीप पाटील यांनी बाजू मांडली. त्यांच्या वर दोषारोष ठेवण्याकरिता पुढील तारीख सहा डिसेंबर नेमण्यात आली आहे.
शिराळा न्यायालयाने राज ठाकरे यांचा अर्ज केला नामंजूर |Shirala court rejected Raj Thackeray's application
0 Comments