BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा मॅरेथॉन संपन्न | Shirala Marathon completed


शिराळा मॅरेथॉन संपन्न | Shirala Marathon completed



शिराळा मॅरेथॉन संपन्न | Shirala Marathon completed


शिराळा मॅरेथॉन संपन्न | Shirala Marathon completed

शिराळा येथे आज वीरा प्रतिष्ठान मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शिराळा मॅरेथॉन-2022 स्पर्धेत जिल्ह्यातील सुमारे दोन हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. प्रचंड उत्साहात स्पर्धा पार पडली.

शिराळा मॅरेथॉन संपन्न | Shirala Marathon completed



सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा घेण्यात आली.  याचे  उद्घाटन जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते झाले.  सांगली जिल्हा अथेलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने झालेल्या स्पर्धेत राज्य अथेलेटिक असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते बापू सामलेवाले व युवराज खटके, हिमंत शिंदे, विजयकुमार शिंदे, संदिप शिंदे, सुनिल पुजारी, प्रताप पाटील, विकास ताटे, बाळासाहेब माने, डॉ. गणेश सिहासन यांनी पंच म्हणून काम केले.

शिराळा मॅरेथॉन संपन्न | Shirala Marathon completed



५ किलोमीटर गटातील १ ते १० क्रमांकाचे पुरुष व महिला विजेते असे : पहिला क्रमांक : धुळदेव घागरे व तृप्ती किरवे (दोघे सांगली), दुसरा क्रमांक : अजित लवटे (नागज) व ज्योती कोळेकर (दुधगाव), तिसरा क्रमांक : मिथुन माने (इरळी) व रोहिणी खिलारे (सांगली), चौथा क्रमांक : ऋषिकेश सुर्यवंशी (कुची) व वैष्णवी भोईटे (सांगली), पाचवा क्रमांक : अभिजीत माने (तासगाव) व मानसी हराळे (सांगली), सहावा क्रमांक : विकास बावडे (मांगले, शिराळा) व हर्षल पाटील (सांगली), सातवा क्रमांक : अभिजीत खोत (दूरंदेवादी, शिराळा) व सिद्धी मानकर (मानकरवाडी, शिराळा), आठवा क्रमांक : प्रथमेश उगळे (चिखली, शिराळा) व शिवानी शेवाळे (शेडगेवाडी, शिराळा), नववा क्रमांक : केरू चिरमुले (आष्टा, वाळवा) व  प्रथमा पाटील (खिरवडे, शिराळा), दहावा क्रमांक : रोहन यादव (येळापुर, शिराळा) व हर्षदा गायकवाड (इंग्रुळ, शिराळा).

शिराळा मॅरेथॉन संपन्न | Shirala Marathon completed


शिराळा मॅरेथॉन संपन्न | Shirala Marathon completed

१० किलोमीटर गटातील १ ते १० क्रमांकाचे पुरुष व महिला विजेते असे : पहिला क्रमांक : प्रविण कांबळे (सांगली) व सानिका रुपनर (नागज), दुसरा क्रमांक : पाडुरंग चौगुले (इरळी) व कोमल निकम (सांगली), तिसरा क्रमांक : चैतन्य रूपनर व करीना साबळे (दोघे नागज),चौथा क्रमांक : समाधान तांबे (जत) व शुभांगी वाघमोडे (सांगली), पाचवा क्रमांक : सुमंत राजभर (सांगली) व माधुरी बाबर (सांगोला), सहावा क्रमांक : सुहास पाटील (नाटोली, शिराळा) व शितल मोहिते (कडेगांव), सातवा क्रमांक : नवलू गावडे (खुंदलापूर, शिराळा) व समृद्धी पवार (कुरळप, वाळवा), आठवा क्रमांक : अशिष गाडे (तासागाव) व मेघा पाटील (कुरळप, वाळवा), नववा क्रमांक : सागर रसाळ (चिकूर्डे, वाळवा) व  सुजाता खोत (शेडगेवाडी, शिराळा), दहावा क्रमांक : ऋषिकेश जाधव व अर्पिता डवरी (दोघे सांगली).

शिराळा मॅरेथॉन संपन्न | Shirala Marathon completed


शिराळा मॅरेथॉन संपन्न | Shirala Marathon completed

५ व १० किलोमीटर स्पर्धेतील पुरुष विजेत्यांना १ ते ६ क्रमांकासाठी दहा, आठ, सहा, चार, दोन, एक हजार रुपये रोख ७ व ८ क्रमांकासाठी आठशे रुपये रोख, ९ व १० क्रमांकासाठी पाचशे रुपये रोख बक्षीस देण्यात आले. ५ व १० किलोमीटर स्पर्धेतील महिला व मुली विजेत्यांना १ ते ५ क्रमांकासाठी आठ, सहा, चार, दोन, एक हजार रुपये रोख,  ६ व ७ क्रमांकासाठी आठशे रुपये रोख, ८ व ९ क्रमांकासाठी पाचशे रुपये रोख, १० व्या क्रमांकासाठी तीनशे रुपये रोख व मेडल, प्रमाणपत्र देण्यात आले. एज लीड टिव्ही व रत्नदीप मोटर्स स्पर्धेचे प्रायोजक होते.

शिराळा मॅरेथॉन संपन्न | Shirala Marathon completed

शिराळा मॅरेथॉन संपन्न | Shirala Marathon completed


 स्पर्धा संपल्यानंतर सर्व स्पर्धकांची नास्त्याची सोय करण्यात आली होती. यावेळी आपला बझार समुहाच्या अध्यक्ष सुनीतादेवी नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, विश्वासचे संचालक विश्वास कदम, बाबासो पाटील व यशवंत निकम, महादेव कदम, महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष साधना पाटील, अमित पाटील, घनश्याम आवटे, सुखदेव पाटील, डॉ. दीपक यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेस विश्वास व विराज उद्योग समूह, मानसिंगभाऊ लोककल्याण अभियान, नगरपंचायत व शिराळा पोलिसांनी सहकार्य केले. एज लीड टीव्ही, रत्नदीप मोटर्स व डॉ. यादव अर्थोपेडिक हॉस्पिटल यांचे सहकार्य व अनेक मान्यवरांचे लाभले. 

शिराळा मॅरेथॉन संपन्न | Shirala Marathon completed






  

Post a Comment

0 Comments