शाळकरी मुलावर बिबट्याचा हल्ला | School boy attacked by leopard
शाळकरी मुलावर बिबट्याचा हल्ला | School boy attacked by leopard
शाळकरी मुलावर बिबट्याचा हल्ला | School boy attacked by leopard
शिराळा ,ता. २०: उखळू (ता.शाहुवाडी) येथील शौचालयासाठी बाहेर गेलेल्या श्रेयश प्रकाश वडाम (वय ९) या चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या शाळकरी मुलावर बिबट्याने पाठीमागून हल्ला करून जखमी केले. ही घटना आज सायंकाळी साडे सहा ते सात वाजण्याच्या सुमारास घडली.
शाळकरी मुलावर बिबट्याचा हल्ला | School boy attacked by leopard
शाळकरी मुलावर बिबट्याचा हल्ला | School boy attacked by leopard
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी श्रेयश हा घराच्या पाठीमागे असलेल्या पाण्याच्या डबक्याजवळ शौचालयासाठी गेला होता. आजूबाजूला झुडपे आहेत. तो पाण्याच्या डबक्यातून पाणी घेत असताना पाठीमागून झुडपात लपलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घालून त्याच्या डोक्यावर पंजा मारून जखमी केले. अंगावर इतर ठिकाणी ही ओरखडे आहेत. अचानक पणे हल्ला झाल्याने भेदरलेल्या व जखमी अवस्थेत श्रेयश घरी गेला. घडलेली घटना घरी सांगितली. त्यास तातडीने उपचारासाठी आरळा येथे नेण्यात आले पण रक्तस्त्राव जास्त होत असल्याने त्यास कराड येथे नेण्यात आले.
शाळकरी मुलावर बिबट्याचा हल्ला | School boy attacked by leopard
घटनास्थळी वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे ,वनरक्षक शिवाजी पाटील ,अरुण गरदी यांनी पाहणी केली. अंधार असल्याने त्या परिसरात बिबट्याचे ठसे दिसून आले नाहीत. उद्या सकाळी त्या ठिकाणी पाहणी केली जाणार असल्याचे वन्यजीव विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.
शाळकरी मुलावर बिबट्याचा हल्ला | School boy attacked by leopard
या परिसरात ५ ते सहा बिबट्यांचा वावर
उखळू व भिसेवाडी आणि अंबाईवाडा परिसरात जवळपास पाच ते सहा बिबट्यांचा वावर आहे. आता पर्यंत वारंवार या परिसरातील कुत्र्यावर व जनावरांवर हल्ले झाले आहेत. त्यामुळे कुत्र्यांची संख्या घटली आहे. आज मुलावर हल्ला झाल्याने लोकांनी बाहेर कसे पडायचे अशी भीती निर्माण झाली असल्याचे मत राजू वडाम यांनी व्यक्त केले.
शाळकरी मुलावर बिबट्याचा हल्ला | School boy attacked by leopard
शाळकरी मुलावर बिबट्याचा हल्ला | School boy attacked by leopard
शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला केल्याने त्यास उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल कराड येथे दाखल केल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना दिली असता त्यांनी तातडीने याबाबतयुवा नेते अतुल भोसले यांच्याशी संपर्क साधून योग्य उपचार करण्याबाबत विनंती केली.
शाळकरी मुलावर बिबट्याचा हल्ला | School boy attacked by leopard
शाळकरी मुलावर बिबट्याचा हल्ला | School boy attacked by leopard
घराच्या पाठीमागे असलेल्या पाण्याच्या टाकीच्या जवळ पाईप लाईन लिकेज असल्याने त्या ठिकाणी असणाऱ्या डबक्यात पाणी साठून रहाते. ते पाणी पिण्यासाठी बिबट्या येत असावा असा ग्रामस्थांचा अंदाज आहे. शिवाय त्या परिसरात झुडपे असल्याने त्यास लपण्यासाठी जागा ही आहे.
शाळकरी मुलावर बिबट्याचा हल्ला | School boy attacked by leopard
0 Comments