मांजराच्या मागे धावत बिबट्या घुसला स्वयपाकघरात | Running behind the cat, the leopard entered the kitchen

मरळनाथपुर ((ता. वाळवा ) येथील हजारे वस्तीत मंगळवारी रात्री काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास बाळासाहेब किसन हजारे यांच्या घरात मांजराच्या मागे धावत बिबट्या घुसल्याने सर्वांची भंबेरी उडाली. मात्र प्रसंगावधान राखून हजारे यांनी घरातील लोकांना बाहेर काढून बिबट्या ज्या खोलीमध्ये आला त्या खोलीचा दरवाजा बंद करून घेतला. आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
मांजराच्या मागे धावत बिबट्या घुसला स्वयपाकघरात | Running behind the cat, the leopard entered the kitchen
मांजराच्या मागे धावत बिबट्या घुसला स्वयपाकघरात | Running behind the cat, the leopard entered the kitchen
या घटनेची माहिती वनविभागाला समजताच उपवनसंरक निता कट्टे, सहाय्यक वन संरक्षक डॉ अजित साजणे, यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल शिराळा सचिन जाधव, वनपाल इस्लामपूर सुरेश चरापले , वनरक्षक रायना पाटोळे , अक्षय शिंदे , वनसेवक शहाजी पाटील, वनसेवक अनिल पाटील ,प्राणी मित्र युनूस मनेर यांच्या टीमने घटनास्थळी तत्काळ भेट दिली. घटनास्थळी जमलेल्या सर्व ग्रामस्थांना सूचना देऊन सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले. बिबट्याचा मागोवा घेतला व अत्यंत हुशारीने व धाडसाने बिबट्या असलेल्या खोलीचा दरवाजा उघडून, त्याच्या मार्ग मोकळा केला असता बिबट्या घरातून बाहेर निघून त्याचे नैसर्गिक अधिवासात मुक्त झाला.
मांजराच्या मागे धावत बिबट्या घुसला स्वयपाकघरात | Running behind the cat, the leopard entered the kitchen
हा बिबट्या सर्वसाधरण १ वर्षाचा होता. मांजराच्या मागे धावत तो स्वयंपाक घरात घुसला . घरातील लोकांनी धाडस दाखवून खोलीचा दरवाजा बंद केला.त्यामुळे कोणालाही इजा झाली नाही . बिबट हा पण सुरक्षित निघुन गेला. माणसावर हल्ला करण्याच्या ह्या उद्देशाने बिबट घरात घुसला नसून भक्ष्याचा पाठलाग करताना घरात घुसला होता . . अजितकुमार पाटील (मानद वन्यजीव रक्षक)

0 Comments