दिव्यांग निधी व महिलांचा सन्मान | Disability fund and respect for women
दिव्यांग निधी व महिलांचा सन्मान | Disability fund and respect for women
शिराळा,ता.२३: मूकबधिर, मतिमंद, गतिमंद विद्यार्थ्यांच्या सन्मान व सत्कार समारंभाच्या निमित्ताने त्यांच्या नवीन ऊर्जा निर्माण करण्याचे काम शिराळा नगरपंचायतने केले आहे.मूकबधिर, मतिमंद व गतिमंद यांच्या असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्या बरोबर पालकासाठी तालुक्याच्या ठिकाणी निवास केंद्र उभारू असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
दिव्यांग निधी व महिलांचा सन्मान | Disability fund and respect for women
शिराळा नगरपंचायतच्यावतीने दिव्यांग,इतर महिला व कर्मचारी यांच्या साठी सन्मान आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी योगेश पाटील हे होते. स्वागत अर्चना गायकवाड यांनी केले. यावेळी एकूण 131 दिव्यांग बांधवाना एकूण 200200/- रुपये इतका दिव्यांग निधी व महिला बालकल्याण निधी अंतर्गत शहरातील साहित्य , साहस व क्रिडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगीरी बजावणा-या विद्यार्थीनी, महिला व शिराळा नगरपंचायत कडील सफाई कर्मचारी यांचा आरोग्य हिरकणी म्हणून व नगरपंचायत मधील महिला अधिकारी/कर्मचारी यांना आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.
दिव्यांग निधी व महिलांचा सन्मान | Disability fund and respect for women
यावेळी भूषण नाईक, अमित गायकवाड, रणजित नलवडे , नागनाथ घाटगे , तानाजी गोसावी ,दिव्यांग, त्यांचे नातेवाईक ,नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
दिव्यांग निधी व महिलांचा सन्मान | Disability fund and respect for women
0 Comments