बिबट्याने हल्ला केलेल्या मुलास २५ हजाराची मदत | 25 thousand aid to a child attacked by a leopard
बिबट्याने हल्ला केलेल्या मुलास २५ हजाराची मदत | 25 thousand aid to a child attacked by a leopard
बिबट्याने हल्ला केलेल्या मुलास २५ हजाराची मदत | 25 thousand aid to a child attacked by a leopard
शिराळा ,ता. २०: उखळू (ता.शाहुवाडी) येथील बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या श्रेयश प्रकाश वडाम मुलाच्या उपचारासाठी वन्यजीव विभागामार्फत तातडीची २५ हजाराची मदत त्यांच्या नातेवाईक यांच्याकडे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक नानासाहेब लडकत यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.
बिबट्याने हल्ला केलेल्या मुलास २५ हजाराची मदत | 25 thousand aid to a child attacked by a leopard
बिबट्याने हल्ला केलेल्या मुलास २५ हजाराची मदत | 25 thousand aid to a child attacked by a leopard
गुरुवारी सायंकाळी साडे सहा ते सात वाजण्याच्या सुमारास श्रेयश हा घराच्या पाठीमागे असलेल्या पाण्याच्या डबक्याजवळ शौचालयासाठी गेला होता. आजूबाजूला झुडपे आहेत. तो पाण्याच्या डबक्यातून पाणी घेत असताना पाठीमागून झुडपात लपलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घालून त्याच्या डोक्यावर पंजा मारून जखमी केले. अंगावर इतर ठिकाणी ही ओरखडे आहेत. अचानक पणे झालेल्या हल्याने तो भेदरलेल्या व जखमी अवस्थेत घरी गेला. त्यास तातडीने उपचारासाठीआरळा येथे नेल्यात आले पण रक्तस्त्राव जास्त होत असल्याने पुढील उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल कराड येथे दाखल केले आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्याच्यावर तातडीने योग्य उपचार करण्याबाबत युवा नेते अतुल भोसले यांच्याशी संपर्क साधून विनंती केली आहे. दरम्यान आज श्रेयश याच्या उपचारासाठी वन्यजीव विभागामार्फत तातडीची २५ हजाराची मदत त्यांच्या नातेवाईक यांच्याकडे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक नानासाहेब लडकत यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. यावेळी सहायक वनसंरक्षक गणेश पाटोळे, वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे ,वनपाल अरुण गरदी, शिवाजी पाटील , राजू वडाम, युवराज पाटील, बनाबाई वडाम, विद्या पाटील,सविता वडाम, उज्वला नांगरे,पूजा वडाम, सुरेखा वडाम, सुजता वडाम उपस्थित होत्या.
बिबट्याने हल्ला केलेल्या मुलास २५ हजाराची मदत | 25 thousand aid to a child attacked by a leopard
श्रेयश वडाम मुलावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याच्यावर कराड येथील कृष्णा हॉस्पिटल मध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती स्थिर असून उपचारासाठी वन्यजीव विभागामार्फत तातडीची २५ हजाराची मदत त्यांच्या नातेवाईक यांच्याकडे सुपूर्द केली आहे. त्याच्या उपचारासाठी वन्यजीव मार्फत सर्वोतोपरी मदत केली जात आहे.
विशाल माळी विभागीय वनाधिकारी चांदोली राष्ट्रीय उद्यान
बिबट्याने हल्ला केलेल्या मुलास २५ हजाराची मदत | 25 thousand aid to a child attacked by a leopard
0 Comments