BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

युवा,उमदे नेतृत्व- विराज नाईक| Young, noble leadership - Viraj Naik

माझे आजोबा लोकनेते स्व.राजारामबापू पाटील व विराज नाईक यांचे आजोबा लोकनेते स्व.फत्तेसिंगआप्पा नाईक यांच्या पासून आमच्या दोन्ही कुटूंबात एक जिव्हाळ्याचे नाते आहे. त्यामुळेच राजारामबापू व विश्वास उद्योग समूह सातत्याने हातात-हात घालून वाटचाल करीत आहेत. राज्याचे माजी मंत्री,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील,शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मानसिंग भाऊ नाईक यांच्याप्रमाणे मी व विराज नाईक खांद्याला खांदा लावून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करीत आहोत. जिल्ह्यातील युवकांना संघटीत करून त्यांची मजबूत फळी उभा करणे,त्यांचे प्रश्न समजून घेवून ते सोडविणे आदी कामावर आमचा भर आहे. ते यामध्ये झोकून देऊन काम करीत आहेत.

युवा,उमदे नेतृत्व-   विराज नाईक| Young, noble leadership - Viraj Naik    

       विराज नाईक हे शांत,संयमी,उच्च विद्याविभूषित युवा नेते आहेत. त्यांच्यावर सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यानंतर ते झपाटून कामाला लागले आहेत. त्यांनी कमी वेळात सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मजबूत युवक संघटन उभा करून आपल्या वरील विश्वास सार्थ केला आहे. 

युवा,उमदे नेतृत्व-   विराज नाईक| Young, noble leadership - Viraj Naik 

युवा,उमदे नेतृत्व-   विराज नाईक| Young, noble leadership - Viraj Naik       

      त्यांच्या माध्यमातून नाईक घराण्यातील तिसरी पिढी राजकारणाबरोबर  सामाजिक कार्यात आघाडीवर आहे. भाऊंनी सहा वर्षां पूर्वी सर्वप्रथम त्यांच्यावर वयाच्या २३ व्या वर्षी  विराज उद्योग समुहाची जबाबदारी दिली. ती जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर चेअरमन व कार्यकारी संचालक पदाची जबाबदारी दिली आहे. ते ही जबाबदारीही आपल्या बुद्धीमत्तेच्या कसोटीवर लिलया पार पाडतील,यात तिळमात्र शंका नाही. आपल्या भागाच्या विकासाकामी तालुक्यामध्ये त्यांनी गाववार दौरे करून भौगोलिक परिथितीचा अगदी जवळुन अभ्यास केला आहे. सर्व सामान्य लोकांच्या अनेक समस्यांचे निराकारण पंचायत समिती,तहसिल कार्यालयामधील कामे अगदी सहजपणे पुर्ण करण्याचा दादांनी प्रयत्न केलेला आहे. राजकीयदृष्टया युवक नेता म्हणुन  आमदार भाऊंचे नेतृत्व बळकट करण्यासाठी तसेच पक्षीय संघटन मजबुत करण्याकामी गाववार राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शाखा निर्माण करण्याचे काम ते जोमाने करत आहेत.     

युवा,उमदे नेतृत्व-   विराज नाईक| Young, noble leadership - Viraj Naik 

      गेल्या ३ वर्षापुर्वी व गतवर्षी  वारणा व कृष्णा नदयांना आलेल्या महापुरामुळे नदीच्या काठावर असणाऱ्या अनेक गावांचे तसेच शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान व हाल झाले. या विपरीत परिस्थीतीमध्ये आपल्या भागाचा दौरा करून लोकांना धीर व आधार देण्याचे काम त्यांनी केले. भाऊच्या मार्गदर्शनाखाली लोकांना आरोग्य सुविधा जीवनावश्यक वस्तु तसेच संसार उपयोगी साहित्य,जनावरांना पशुखाद्य उपलब्ध करून त्याचे वाटप करण्याचे काम केले आहे.

युवा,उमदे नेतृत्व-   विराज नाईक| Young, noble leadership - Viraj Naik  

युवा,उमदे नेतृत्व-   विराज नाईक| Young, noble leadership - Viraj Naik    

     दोन वर्षाच्या कोरोना च्या जागतिक महामारीमुळे लोकांचे झालेले हाल पाहुन ते सतत व्यथित  होते. आपण या परथितीमध्ये लोकांना काहीतरी मदत केली पाहिजे असा विचार ते सतत करीत होते. त्याकामी त्यांनी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उप केंद्र तसेच ग्रामिण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय   येथील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यां साठी सॅनिटायझर मशिन, सॅनिटायझर,मास्क फेस सिल्ड मास्क, पीपीई किट इ. साहित्याचे वाटप केले. आरोग्य सेविका, तसेच अंगण वाडी सेविकांना सुध्दा गावस्तरावर या साहित्याचे वाटप केले. तालुक्याचे तहसील, पंचायत समिती, पोलिस ठाणे व कार्यालया तील  सर्व कर्मचाऱ्यांना वरील सर्व साहित्य देण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी राबविला आहे.  तालुक्यातील सर्व गावामध्ये ग्रामपंचायत व आरोग्य सेविका यांच्या माध्यमातुन लोकांचे आरोग्य सुरक्षित रहावे या कामी कोरोना या साथीमध्ये अर्सेनिक अल्बम गोळयांचे वाटप गाववार प्रत्येक कुटूंबापर्यंत पोहोच करणेचे महत्वपुर्ण काम करून लोकांना आधार  देण्याचे काम केले.     

युवा,उमदे नेतृत्व-   विराज नाईक| Young, noble leadership - Viraj Naik   

     कोरोनाची लाट कमी झाली असता त्यांच्या संकल्पनेतुन महिला सबलिकरण कार्यक्रमाअंतर्गत शिराळा विधानसभा मतदार संघातील सर्व गावामध्ये महिलांना कमी दरामध्ये आटा चक्की वाटपाचा कार्यक्रम घेतला. त्याचा फायदा ग्रामीण भागातील महिलांना झाला. या सर्व  कामांचा व या २ वर्षातील कठीण परिस्थीतीमध्ये दादांनी केलेल्या समाज उपयोगी कामाची दखल घेवुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील साहेब व पक्षातील वरीष्ठ मंडळीनी  त्यांच्यावर सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्ष पदाची संधी दिली. यातूनच खऱ्या अर्थाने त्यांचे  बहु आयामी नेतृत्व जिल्हाभर पोहचले.  जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेनंतर त्यांनी  सर्वच तालुक्यांना भेटी देऊन पक्षीय संघटना मजबूत करणे कामी युवकच्या तालुका कार्यकारणी केल्या आहेत.

युवा,उमदे नेतृत्व-   विराज नाईक| Young, noble leadership - Viraj Naik  

युवा,उमदे नेतृत्व-   विराज नाईक| Young, noble leadership - Viraj Naik    

 जिल्हयातील सर्वच तालुक्या मध्ये युवकांना वाटणाऱ्या समस्या जाणून घेण्याचे काम ते प्रामाणिकपणे करीत असुन जिल्हयातील युवकांच्यासाठी काहीतरी भरीव काम करणेचा दादांचा मानस आहे. गत वर्षी २२ सप्टेंबर २०२१ रोजी  दादा यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला गेला. त्यावेळी कोरोनाच्या काळात काम करणाऱ्या सर्व यंत्रणेचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान केला. युवकांना नवी दिशा मिळावी म्हणून युवा उद्योजक या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले. सर्व सामान्य लोकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, त्यासाठी त्यांना लागणारी कागदपत्रे मिळवण्यासाठी अडचणी येवू नये,यासाठी लागणाऱ्या सर्व कागद पत्रांची व दाखल्यांची उपलब्धता ही मानसिंगभाऊ लोक कल्याणकारी योजना राबवून त्या माध्यमातून मिळवून दिली जात आहेत. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत एक हजारावर लोकांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. आता त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने महिलांना व्यासपीठ मिळावे यासाठी खेळ पैठणीचा मान सौभाग्याचा  व युवकांच्यासाठी नोकरी महोत्सव व युवा उद्योजक शिबीर अंतर्गत प्रसिद्ध उद्योजक बी.व्ही.जी. ग्रुपचे अध्यक्ष मा.हणमंतराव गायकवाड यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.  सर्वच क्षेत्रात आघाडी घेत राहणाऱ्या युवा मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

    प्रतिकदादा जयंतराव पाटील 

                अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल  असो.,मुंबई

युवा,उमदे नेतृत्व-   विराज नाईक| Young, noble leadership - Viraj Naik

युवा,उमदे नेतृत्व-   विराज नाईक| Young, noble leadership - Viraj Naik    

Post a Comment

0 Comments