BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विश्वास कारखाना वार्षिक सभा | vishwas Factory Annual Meeting

विश्वास कारखाना वार्षिक सभा | vishwas Factory Annual Meeting



विश्वास कारखाना वार्षिक सभा | vishwas Factory Annual Meeting


विश्वास कारखाना वार्षिक सभा | vishwas Factory Annual Meeting

 शिराळा ,ता.२४:सहवीज निर्मिती व डिस्टिलरी प्रकल्प कर्जमुक्त झाला आहे.  कारखान्याने नेहमी शेतकरी हिताचेच निर्णय घेतले असून  साखरेला  ३६०० ते ३८०० रुपये दर मिळाल्यास  उसाला एफ .आर. पी .पेक्षा जादा दर देता येईल असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

विश्वास कारखाना वार्षिक सभा | vishwas Factory Annual Meeting

 भाटशिरगाव ता.शिराळा येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक लायन सेवा केंद्र येथे विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत बोलत होते. यावेळी  नाईक म्हणाले, १५ मेगावॅटचा  सहवीज प्रकल्प असून आणखी सहा मेगावॅटच्या  प्रकल्पाचे काम सुरु आहे.  या वर्षी डिस्टिलरीची  क्षमता प्रतिदिनी तीस हजार लिटर वरून साठ हजार  तर पुढील वर्षी नव्वद हजार लिटर करणार आहे.  निती आयोगाच्या शिफारशी नुसार साखरेच्या किमती वाढत नसल्यामुळे उसाला जादा दर देता येत नाही.  साखरेला ३६०० ते ३८०० रुपये दर मिळाला तर उसाला एफ. आर. पी. पेक्षा जादा दर देता येईल. 

विश्वास कारखाना वार्षिक सभा | vishwas Factory Annual Meeting


विश्वास कारखाना वार्षिक सभा | vishwas Factory Annual Meeting

फतेसिंगराव नाईक इंडोमेंट ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत दाखले वाटप, गरजुंना वैद्यकीय मदत, आनंदराव नाईक गुणवत्ता पुरस्कार वितरण, महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून व्यासपीठ उपलब्ध करून आहे. इंडोमेंट ट्रस्ट साठी घेतलेला पैसा हा सभासदांच्यासाठीच खर्च केला जात आहे. माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी तीन वर्षात  वाकुर्डे योजनेसाठी तीनशे व वारणा कालव्यासाठी तीनशे असा सहाशे कोटी रुपयांचा भरघोस निधी दिल्याने शिराळा व वाळवा तालुक्यातील शेतीला फायदा होणार असून ऊसाचे उत्पादन वाढणार आहे.

विश्वास कारखाना वार्षिक सभा | vishwas Factory Annual Meeting


विश्वास कारखाना वार्षिक सभा | vishwas Factory Annual Meeting

स्वागत व प्रास्ताविक विजयराव नलवडे व नोटीस वाचन कार्यकारी संचालक अमोल पाटील  यांनी केले.सर्व विषय टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले. यावेळी रणजितसिंह नाईक, सम्राट शिंदे, बजरंग चरापले, भिमराव पाटील, अर्जुन पाटील, संदीप गुरव, बाबुराव पाटील, मारुती पाटील, वसंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

विश्वास कारखाना वार्षिक सभा | vishwas Factory Annual Meeting


विश्वास कारखाना वार्षिक सभा | vishwas Factory Annual Meeting

कार्यक्रमास उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, सुनितादेवी नाईक,सौ शिमोनी नाईक, अश्विनीताई नाईक, दिपाली नाईक,अमरसिंह  नाईक, राजेंद्रसिंह नाईक, सम्राटसिंह नाईक, विराज नाईक, भुषण नाईक,शाहू नाईक ,उदयसिंह नाईक ,  दिनकरराव  पाटील, विश्वास कदम,  बी,के,नायकवडी, महादेव कदम, अजय जाधव, कोंडीबा चौगुले,शिवाजी पाटील,सचिव सचिन पाटील,युवराज गायकवाड उपस्थित होते.आभार हंबीराव पाटील यांनी मानले.

विश्वास कारखाना वार्षिक सभा | vishwas Factory Annual Meeting






Post a Comment

0 Comments