BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मुली झाल्याच्या रागातून पतीनेच पत्नीला विहिरीत ढकलून दिले |It was the husband who pushed his wife into the well out of anger at having a daughter

इस्लामपूर: येथील कोळी मळा परिसरातील  राजनंदिनी कौस्तुभ  सरनोबत यांचा काल विहिरीत पाय घसरून व पाण्यात बुडून झालेला मृत्यू हा अपघाती मृत्यू नसून तो खून असल्याचे उघडकीस आले आहे.राजनंदिनी हिचा पती कौस्तुभ कृष्णराव सरनोबत (वय २९, रा. कोळी मळा, इस्लामपूर) याच्याविरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

मुली झाल्याच्या रागातून पतीनेच पत्नीला  विहिरीत ढकलून  दिले |It was the husband who pushed his wife into the well out of anger at having a daughter 

 राजनंदिनी यांच्या माहेरचे नातेवाईक मिलिंद नानासाहेब सावंत (वय २६, रा. रमण मळा, कसबा बावडा, कोल्हापूर) यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती कौस्तुभ कृष्णराव सरनोबत याला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मुली झाल्याच्या रागातून पतीनेच पत्नीला  विहिरीत ढकलून  दिले |It was the husband who pushed his wife into the well out of anger at having a daughter 

 पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजनंदिनी हिला पहिल्या दोन्ही मुलीच झाल्याचा राग कौस्तुभच्या मनात होता. एक मुलगी दोन ते अडीच वर्षांची तर दुसरी मुलगी अवघी सहा महिन्यांची आहे. या रागातून कौस्तुभ याने काल रविवारी  पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकला जाण्याचा बहाणा करत पत्नीला आपल्या दुचाकीवरून कापूसखेड रस्त्याच्या दिशेने घेऊन गेला.  कापूसखेड गावच्या हद्दीत रस्त्यापासून ३० ते ४० फूट अंतरावर असलेल्या एका शेतात नेले. 

मुली झाल्याच्या रागातून पतीनेच पत्नीला  विहिरीत ढकलून  दिले |It was the husband who pushed his wife into the well out of anger at having a daughter 

तेथे संदीप पाटील व विनायक पाटील यांच्या सामायिक मालकीच्या पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत राजनंदिनी हिला ढकलून दिले. तिला पोहता येत नसल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मात्र  पोलिसात माहिती देताना मात्र हा मृत्यू लघुशंकेसाठी विहीर परिसरात गेल्यानंतर पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याचे कौस्तुभ याने पोलिसांना सांगितले होते. राजनंदिनी यांच्या नातेवाईकांनी मात्र हा घातपात असल्याची शंका व्यक्त करत पोलिसांनी याची चौकशी करावी, अशी मागणी कालपासूनच लावून धरली होती.

मुली झाल्याच्या रागातून पतीनेच पत्नीला  विहिरीत ढकलून  दिले |It was the husband who pushed his wife into the well out of anger at having a daughter 

Post a Comment

0 Comments