शिराळा ,ता,२३: वीरा प्रतिष्ठान मार्फत २५ सप्टेंबर २०२२ रोजी शिराळा येथील साई संस्कृती हॉल, युवा उद्योजक शिबीर, नोकरी महोत्सव व बी. व्ही. जी. लाईफ सायन्स मार्फत मोफत आर्युवेदीक आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती वीरा प्रतिष्ठान मार्फत प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
या पत्रकात म्हटले की, सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज मानसिंग नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षांपासून विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. सकाळी १० वाजता शिराळा तालुका व परिसरातील सर्व क्षेत्रातील युवकांच्यासाठी भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष, उद्योजक हणमंतराव गायकवाड हे उद्योजकतेची प्रेरणा देणारे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असतील.
उद्योजक मार्गदर्शन शिबीरासोबत युवकांना नोकरीचीही संधी उपलब्ध करून देण्यासाठी नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या नोकरी महोत्सवात महाराष्ट्रातील अग्रगण्य कंपन्या सहभागी होणार आहेत. दहावी पास, नापास पासून ते विविध क्षेत्रातील पदवी, पदवीका, व्यवसायिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी सहभागी व्हावे. त्यासाठी नाव नोंदणी कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळी ९ वाजल्यापासून सुरु होणार आहे..दरम्यान बी. व्ही. जी. लाईफ सायन्स मार्फत आर्युवेदीक आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबीरात कर्करोग, किडणी, ह्रदयविकार, मधुमेह आदी र्दुधर आजारावर आर्युवेदीक पध्दतीने मोफत तपासणी, सल्ला, औषधे वाटप करण्यात येईल. गरजुनी या संधीचा फायदा करून घ्यावा. नोकरी महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या युवकांनी येताना आवश्यक कागदपत्रे आणावीत.
0 Comments