चिखली (ता. शिराळा) येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कदम यांच्या उपस्थितीत औंढी (ता. शिराळा) गावचे माजी सरपंच बाळासाहेब कांबळे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. आमदार नाईक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महेश पाटील, अभय पाटील, अमर खोत, दिलीप लोहार, दत्ता पाटील, डॉ दिनकर जाधव, शंकर पाटील, संजय खोत आदी उपस्थित होते.
0 Comments