BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आदर्श खेळाडू घड़वण्यासाठी सुसज्ज मैदाने तयार करू :नामदार रमेश तवडकर

 आदर्श खेळाडू घड़वण्यासाठी सुसज्ज मैदाने तयार करू :नामदार रमेश तवडकर

 चिखली (ता.शिराळा) येथे विश्वास विद्यानिकेतनमध्ये आयोजित  13 व्या  राज्यस्तरीय डॉज बॉल  अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना गोवा विधानसभेचे सभापती ना. रमेश तवडकर,आमदार मानसिंगराव नाईक, अमरसिंह नाईक, रणधीर नाईक,भूषण नाईक  व इतर 

शिराळा ,ता.१७:आदर्श खेळाडू घड़वण्यासाठी सुसज्ज मैदाने तयार करू असे प्रतिपादन गोवा विधानसभेचे सभापती ना. रमेश तवडकर यांनी केले.

 चिखली (ता.शिराळा) येथे विश्वास विद्यानिकेतनमध्ये आयोजित  13 व्या राज्यस्तरीय डॉज बॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.  यावेळी तवडकर म्हणाले, या युवा पिढीवर  भारत देशाची जबाबदारी आहे. विश्वास शिक्षण प्रसारक मंडळाने या  स्पर्धेचे अतिशय उत्कृष्ट नियोजन, संयोजन  व मुलांच्या राहण्याची व जेवणा उत्तम  व्यवस्था पाहुन त्यांनी समाधान व्यक्त करत संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह नाईक यांचे कौतुक केले. 

 आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले,खेळात हार व जीत ठरलेली असते. जिंकणाऱ्याने यश व हरणाऱ्याने पराजय पचावला शिकायला पाहिजे. त्यावेळी  तुमच्यामध्ये गुंणवंत व यशवंत खेळाडू तयार होतील. खेळाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात यश संपादन करता  येते . त्यासाठी अफाट कष्टाची तयारी ठेवा.

 स्पर्धा मध्ये महाराष्ट्र राज्यातून मुलांचे २८ व मुलींचे २२ संघ सहाभागी झाले आहेत.राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमधे हरियाणा येथे कांस्य पदक मिळवल्या बद्दल पैलवान  करण वाघवे, साक्षी पाटील ने राष्ट्रीय शालेयअँथल्यांटिक्स ६०० मी.मध्ये  सुवर्ण पदक व ४००  मी. मध्ये कांस्य पदक मिळवलेबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

 यावेळी विश्वास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, असोसिएशनचे सहायक सचिव हणमंत लुंगे,माजी क्रीडा संचालक डॉ.जनक टेकाळे ,डॉ.जगदीश झाडबुक्के, माजी प्राचार्य अशोक काळे, डॉ.सतीश पाटील ,राजू कदम, माजी जिल्हापरिषद सदस्य रणधीर नाईक, सत्यजीत नाईक, बाबासाहेब पवार, भूषण नाईक, प्राचार्य प्रा. एस.आर. पाटील, डॉ.सतीश माने,  उपस्थित होते. प्रास्ताविक पी.आर.वरेकर यांनी केले.  आभार टी.एस. पाटील यांनी मानले.


Post a Comment

0 Comments